IPL 2026 Ponits Table : गुजरातला सलग तिसऱ्या विजयानंतर तगडा फायदा, पॉइंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानी झेप?
Tv9 Marathi April 18, 2026 09:45 AM

शुबमन गिल याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स टीमला आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) अपेक्षित सुरुवात करण्यात अपयश आलं. गुजरातला पहिल्या 2 सामन्यांमध्ये पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्सकडून पराभव स्वीकारावा लागला. मात्र गुजरातने त्यानंतर कमबॅक काय असतं आणि ते कसं करतात हे दाखवून दिलं. गुजरातने 17 एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 5 विकेट्सने विजय मिळवला. केकेआरने यासह विजयी हॅट्रिक लगावली. गुजरातने केकेआरआधी लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिट्ल्सला पराभूत केलं. गुजरात टायटन्सला सलग तिसऱ्या विजयानंतर तगडा फायदा झाला आहे. गुजरातने या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानी झेप घेतली आहे हे जाणून घेऊयात.

गुजरातने एकूण आणि सलग तिसऱ्या विजयासह इतर संघांची डोकेदुखी वाढवली आहे. गुजरातने पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतलीय. गुजरातने पॉइंट्स टेबलमध्ये टॉप 4 मध्ये एन्ट्री केली आहे. तर एकूण पाचव्या पराभवानंतर केकेआर दहाव्या स्थानी कायम आहे. केकेआरचं इथून प्लेऑफमध्ये पोहचणं प्रचंड अवघड झालंय.

सामन्यात काय झालं?

गुजरातने केकेआरवर घरच्या मैदानात 5 विकेट्सने विजय मिळवला. केकेआरने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गुजरातसमोर 181 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. केकेआरने हे आव्हान 19.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं.

गुजरातची चौथ्या स्थानी झेप

केकेआरला पराभूत करताच गुजरातला पॉइंट्स टेबलमध्ये 2 स्थानांचा फायदा झाला. गुजरात सहाव्या स्थानावरुन चौथ्या क्रमांकावर येऊन पोहचली. गुजरातच्या खात्यात 5 सामन्यांनंतर 6 गुण झाले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, गुजरातचा नेट रनरेट हा प्लस झाला आहे. गुजरातचा नेट रनरेट +0.018 असा झाला आहे. केकेआर विरूद्धच्या सामन्याआधी गुजरातचा नेट रनरेट हा -0.029 असा होता.

गुजरातमुळे 2 संघांना झटका

गुजरातमुळे 2 संघांची घसरण झाली आहे. दोन्ही संघांची 1 स्थानाने घसरण झालीय. सनरायजर्स हैदराबाद पाचव्या स्थानी घसरण झालीय. तर दिल्ली कॅपिट्ल्स पाचव्या क्रमांकावरुन सहाव्या स्थानी पोहचली आहे.

पहिल्या स्थानी कोण?

दरम्यान पंजाब किंग्स पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी विराजमान आहे. पंजाबने 5 पैकी 4 सामने जिंकलेत. पंजाबचा 1 सामना पावसाने वाया घालवला. पंजाबनंतर आरसीबी आणि राजस्थान रॉयल्स अनुक्रमे दुसऱ्या-तिसऱ्या स्थानी आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी 4 सामने जिंकलेत. मात्र आरसीबीचा नेट रनरेट राजस्थानपेक्षा भारी असल्याने ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.