Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर करणार
Saam TV April 18, 2026 11:45 AM
Ashok kharat Case: भोंदू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर करणार

भोंदू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर करणार

व्हीसीद्वारे कोर्टासमोर हजर केलं जाणार

महिलांच्या लैंगिक शोषणाच्या चौथ्या गुन्ह्यातील खरातची पोलीस कोठडी आज संपत असल्यानं कोर्टात हजर केलं जाणार

पाचव्या दाखल गुन्ह्यात ताब्यासाठी SIT कडून अर्ज दाखल केला जाणार

SIT कडून पुढील चौकशीसाठी खरातच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाणार

कोर्टाच्या निर्णयावर पुढील कारवाईचे चित्र होणार स्पष्ट

नाशिकच्या TCS कंपनी प्रकरण; आरोपींच्या व्हॉट्सॲप ग्रुपमधून धर्मांतराचा कट उघड

नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतरण आणि महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण प्रकरण

आरोपींच्या व्हॉट्सॲप ग्रुपमधून धर्मांतराचा कट उघड

नाशिकमध्ये टीसीएस प्रकरणात SIT तपासाला वेग

आरोपींचे मोबाईल, लॅपटॉप जप्त करून क्लोनिंग

चॅटिंगमधून संशयास्पद संवाद आले समोर

पीडितांना फसवण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुपचा वापर केल्याचा संशय

डिजिटल पुरावेच आता संपूर्ण प्रकरणाचे सत्य उघडणार

खामगाव शहरा नजीक असलेल्या वाडी परिसरात आर्या हॉटेलमध्ये LPG सिलेंडरचा स्फोट

खामगाव शहरा नजीक असलेल्या वाडी परिसरात आर्या हॉटेलमध्ये दोन एलपीजी सिलेंडर चा स्पोट.

स्फोटानंतर हॉटेलला भीषण आग, हॉटेलच्या आत मध्ये दोन जण अडकल्याची भीती.

खामगाव अग्निशमन दल व पोलीस घटनास्थळी पोहोचलं, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू.

हॉटेल रहिवासी परिसरात असल्याने शेजारील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवीण्याची प्रक्रिया सुरु.

Tuljabhavani: कर्नाटकातील भाविकांकडून तुळजाभवानीला तीन लाखाची देणगी

कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्याच्या हुमनाबाद तालुक्यातील मल्लिकार्जुन कलगी या भक्ताने श्री तुळजाभवानीच्या चरणी तीन लाख रुपयांची देणगी अर्पण केली आहे.मल्लिकार्जुन कलगी हे तुळजापूर येथे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आल्यानंतर तुळजाभवानीच्या चरणी तीन लाख रुपयाची देणगी अर्पण केली. तुळजाभवानी मंदिर संस्थान कडे ही देणगी सुपूर्त केली यावेळी मंदिर संस्थांच्या वतीने देवीची प्रतिमा देऊन या भाविकाचा सन्मान करण्यात आला.

भेंडवळची ऐतिहासिक घटमांडणी १९ एप्रिलला..

पीकस्थिती, पावसाचे प्रमाण तसेच सामाजिक, आर्थिक आणि राजकीय घडामोडींचा अंदाज वर्तविणारी भेंडवळ ची पारंपरिक घटमांडणी यावर्षी १९ एप्रिल रोजी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर होणार आहे .. त्यानंतर 20 एप्रिल ला सकाळी सूर्योदय अगोदर भाकीत केले जाणार आहे, या मांडणीद्वारे पावसाचे भाकीत काय येणार, याकडे संपूर्ण शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.. विदर्भासह राज्यभर प्रसिद्ध असलेल्या या घटमांडणीतून अतिवृष्टी, दुष्काळ, पीकस्थिती, आर्थिक तसेच राजकीय परिस्थिती आणि विविध संकटांबाबत अंदाज वर्तविले जातात.. त्यामुळे या मांडणीबाबत शेतकरी वर्गासह राजकीय नेते, आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठी उत्सुकता असते..

Vidarbha: विदर्भात तीव्र उष्णतेची लाट कायम

विदर्भात तीव्र उष्णतेची लाट कायम, अमरावतीत सर्वाधिक 44.4 अंश सेल्सियस तापमानाची नोंद

आज नागपुरात शाळा महाविद्यालयांना सुट्टी.... वाढतं तापमान पाहता उष्ण लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा इशारा...

विदर्भातील सहा जिल्हाचे तापमान 44 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक

अकोल्याच्या तापमानात किंचित घट, मात्र, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, वाशीम आणि गडचिरोलीच्या तापमानात वाढ

Yavatmal: यवतमाळ ग्रामपंचायत पोटनिवडणुकीकडे उमेदवारांची पाठ

यवतमाळ जिल्ह्यातील रिक्त असलेल्या 47 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.दरम्यान नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चार सरपंच पदासाठी नऊ तर 86 सदस्यांकरिता 50 अर्ज प्राप्त झाले होते. विशेष म्हणजे 67 जागे करिता एकही नामनिर्देशन पात्र दाखल झाले नाहीये यावरून पोटनिवडणुकीकडे उमेदवारांनी पाठ फिरवल्याचे स्पष्ट चित्र दिसून आले.यामुळे निवडणूक विभागाची डोकेदुखी वाढणार आहे.

PMC: पुणे महापालिकेच्या 13 प्रभाग समित्या बिनविरोध....

महापालिकेच्या पंधरा प्रभात समित्यांच्या अध्यक्षपदासाठी शुक्रवारी अर्ज दाखल करण्यात आले पंधरापैकी तेरा समित्यांची निवडणूक अपेक्षाप्रमाणे बिनविरोध होणार असून दोन प्रभाग समित्यांच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे 13 पैकी बारा समित्यांचे अध्यक्ष पद भाजपाला मिळणार असून एका समितीवर काँग्रेसचे अध्यक्ष असणार आहे.

Pune: पुणे शहरातील 216 उद्याने जास्त वेळ राहणार खुली...

महापालिकेच्या उद्यान विभागाने उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील उद्यानांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे यानुसार 15 जून 2026 पर्यंत उद्याने सकाळी सहा ते अकरा आणि सायंकाळी चार ते नऊ या वेळेत खुली राहतील तसेच मत्स्यालयाची वेळ सकाळी आठ ते 11 आणि संध्याकाळी चार ते नऊ अशी निश्चित केली आहे.

Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यात नऊ लाख हेक्टरवर खरीप हंगामाचे नियोजन

यवतमाळ जिल्हा कृषी विभागाने 2026-27 च्या खरीप हंगामासाठी कंबर कसली असून जिल्ह्यात नऊ लाख 14 हजार 807 हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाचे नियोजन केले आहे.जिल्ह्यात गतवर्षीचा एक लाख 7 हजार मॅट्रिक टन खताचा साठा शिल्लक आहेत तर यंदा दोन लाख 53 हजार मॅट्रिक टन रासायनिक खताची आवश्यकता भासणार आहे त्यामुळे खताची टंचाई भेडसावण्याची शक्यता कमी आहे.

Pune: ओव्हरहेड केबल विरोधी कारवाईला ब्रेक....

अनधिकृत ओव्हरहेड केबल बाबत कुठलेही धोरण निश्चित नसताना महापालिकेने त्याविरुद्ध अचानक कारवाई सुरू केली अचानक याबाबत केंद्र सरकारची नियमावली असल्याची माहिती पुढे आली आता त्याचा आधार घेत महापालिका त्याबाबतची नियमावली करणार आहे त्यामुळे केबल विरोधी कारवाई स्थगिती झाली आहे.

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळार विमान अपघात; धावपट्टीचे काम स्थगित

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीचे कामकाज सध्या भारतीय हवाई दलाच्या विमानाच्या घडलेल्या घटनेमुळे तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

सुदैवाने, विमानातील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत आणि कोणत्याही नागरी मालमत्तेचे नुकसान झालेले नाही.

या संदर्भात सर्व संबंधित विमान कंपन्यांना सूचित करण्यात आले असून, धावपट्टी पूर्ववत करून नियमित सेवा सुरू होण्यासाठी अंदाजे ५ तासांचा कालावधी लागू शकतो.

परिस्थिती लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी मी स्वतः विमानतळ संचालक आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात आहे.

पुणे विमानतळावर रनवे अपघात प्रकरण, रनवे दुरुस्त करण्याचे काम पूर्ण

रनवे दुरुस्त करण्याचे काम पूर्ण

सकाळी ७ः३० पासून विमाने उडण्यास सुरुवात होणार

तर ८ वाजल्यापासून विमाने उतरण्यास सुरुवात होणार

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सूचनेवरून वेगाने काम पूर्ण

रनवेचे काम युद्धपात़ळीवर पूर्ण करण्यात यश

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.