IPL 2026: रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा झंझावात की दिल्ली कॅपिटल्सचा पलटवार? आजचा सामना ठरणार थरारक, कशी असेल Playing XI
esakal April 18, 2026 01:45 PM

बंगळूर :गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा संघ आज (ता. १८) आयपीएल साखळी फेरीतील लढतीत दिल्ली कॅपिटल्सशी सामना करणार आहे. बंगळूरच्या संघाला पाचव्या विजयाची आस लागली असून दिल्लीचा संघ सलग तिसरा पराभव टाळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

बंगळूर संघाने पहिल्या पाचपैकी चार लढतींमध्ये विजय मिळवून आपले वर्चस्व दाखवून दिले आहे. विराट कोहली याने दोन अर्धशतकांसह २२८ धावा फटकावल्या आहेत. तो प्रतिमेला साजेशी कामगिरी करीत आहे; मात्र बंगळूर संघ फक्त त्याच्या फलंदाजीवरच अवलंबून नाही.

IPL 2026, LSG vs DC: लखनौसह रिषभ पंतचीही अग्निपरिक्षा; अक्षर पटेलच्या दिल्ली कॅपिटल्सशी आज सामना; कशी असेल Playing XI

कर्णधार रजत पाटीदार, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, टीम डेव्हिड या फलंदाजांकडूनही छान कामगिरी होत आहे. रजत पाटीदार याने तर २१ षटकारांचा पाऊस पाडला आहे. वैभव सूर्यवंशी याने १८ षटकार मारलेले आहेत.

दिल्ली संघातील गोलंदाजांना अपेक्षेनुसार अव्वल दर्जाची कामगिरी अद्याप करता आलेली नाही. कर्णधार अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेशकुमार, टी. नटराजन या गोलंदाजांना खेळ उंचावण्याची गरज आहे. बंगळूरच्या संघामध्ये जॉश हेझलवूडचे पुनरागमन झाले आहे. तसेच त्याच्याकडून प्रभावी कामगिरीही होत आहे.

IPL 2026: वैभव सूर्यवंशी vs गुजरातची गोलंदाजी आज रंगणार सुपरफास्ट लढत; गिलसमोर पहिल्या विजयाचे मोठे आव्हान, कशी असेल संभावित Playing XI संभावित प्लेइंग इलेव्हन

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा: फिल सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टीम डेव्हिड, रोमारिओ शेफर्ड, कृणाल पंड्या, रसिक सलाम, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड. 

दिल्ली कॅपिटल्स: केएल राहुल (यष्टीरक्षक), पाथुम निसांका, समीर रिझवी, अक्षर पटेल (कर्णधार) ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, आकिब नबी, लुंगी एनगिडी, कुलदीप यादव, टी नटराजन, मुकेश कुमार. 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.