सनरायझर्स हैदराबाद vs चेन्नई सुपरकिंग्स; दाक्षिणात्य संघांमध्ये आज लढाई, हिंगे, हुसेनच्या गोलंदाजीकडे लक्ष,कशी असेल Playing XI
esakal April 18, 2026 01:45 PM

हैदराबाद : पहिल्या चार सामन्यांत फक्त एकाच लढतीत विजय मिळवणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाने पाचव्या लढतीत राजस्थान रॉयल्स संघावर दिमाखदार विजय मिळवला. या लढतीत जयदेव उनाडकट व हर्षल पटेल या गोलंदाजांना वगळून प्रफुल्ल हिंगे व साकीब हुसेन या युवा गोलंदाजांना संधी देण्यात आली होती.

हैदराबादची ही चाल यशस्वी ठरली. आता हैदराबाद संघासमोर आज घरच्या मैदानावर होत असलेल्या आयपीएल साखळी लढतीत चेन्नई सुपरकिंग्सचे आव्हान असणार आहे. याप्रसंगी दोन्ही दाक्षिणात्य संघ तिसऱ्या विजयासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसतील.

Ruturaj Gaikwad: 'काळजी नको, लवकरच मी...', ऋतुराज खराब फॉर्मवर स्पष्ट बोलला; CSK च्या खराब फिल्डिंगबद्दल काय म्हणाला?

हैदराबाद संघाने प्रफुल्ल हिंगेव साकीब हुसेन यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर राजस्थानचा विजयरथ रोखला. प्रफुल्ल हिंगे व साकीब हुसेन यांनी प्रत्येकी चार फलंदाज बाद करीत विजयात मोलाचा वाटा उचलला.

आता चेन्नईविरुद्धच्या लढतीतही या दोन युवा वेगवान गोलंदाजांकडून अशाच प्रकारच्या दमदार कामगिरीची अपेक्षा केली जात आहे. हैदराबाद संघातील फलंदाजी विभाग हा भक्कम आहे. कर्णधार ईशान किशन, अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड व हेनरिक क्लासेन या खेळाडूंमुळे हैदराबादचा फलंदाजी विभाग दर्जेदार ठरतो.

CSK vs PBKS: ऋतुराज गायकवाडने चेन्नईच्या सलग दुसऱ्या पराभवासाठी कोणाला धरलं जबाबदार? म्हणाला, 'कधी कधी आमच्याकडून...' धोनीची अनुपस्थिती कायम

दिग्गज खेळाडू महेंद्रसिंग धोनी हैदराबादविरुद्धच्या लढतीतही चेन्नई संघाकडून खेळताना दिसणार नाही. मुंबईविरुद्धच्या वानखेडे स्टेडियमवरील लढतीत तो चेन्नई संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसण्याची शक्यता आहे. संजू सॅमसन व आयुष म्हात्रे या दोन फलंदाजांकडून ठसा उमटवला जात आहे; मात्र कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्या बॅटमधून अद्याप धावा निघालेल्या नाहीत. ऋतुराज गायकवाड फॉर्ममध्ये येणे महत्त्वाचे ठरणार आहे, अन्यथा चेन्नई संघाचा पुढील मार्ग खडतर असणार आहे.

संभावित प्लेइंग इलेव्हन

सनरायझर्स हैदराबाद (SRH) : ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, अनिकेत वर्मा, ईशान किशन (कर्णधार/यष्टिरक्षक), आर. स्मरण, हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, कमिंदु मेंडिस, ब्रायडन कार्स, हर्षल पटेल, जयदेव उनादकट

चेन्नई सुपर किंग्स (CSK): ऋतुराज गायकवाड (कर्णधार), आयुष म्हात्रे, संजू सॅमसन, शिवम दुबे, डेवाल्ड ब्रेविस, उर्विल पटेल, जैमी ओव्हरटन, रामकृष्ण घोष, खलील अहमद/मुकेश चौधरी, नूर अहमद, अकिल होसेन

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.