Horoscope News : आज 18 एप्रिलला बनतोय डबल राजयोग; 5 राशींसाठी उद्याचा दिवस ठरणार सोन्याचा !
esakal April 18, 2026 11:45 AM

Rashi Bhavishya In Marathi : आज 18 एप्रिल 2026ला शनी मीन राशीत संक्रमण करणार आहे. त्यामुळे त्यांची मंगळ आणि बुध राशीसोबत युती होणार आहे. तर शुक्र सूर्य आणि बुधाचा संचार मेष राशीत आहे. यामुळे त्रिग्रही योग बनणार आहे. तर मेष राशीत सूर्य आणि चंद्राच्या बाराव्या भावात मंगळ आणि बुधची युती झाल्यामुळे अनफा आणि वेशी योग यांचा संयोग बनणार आहे.

या सर्व राजयोगांचा फायदा पाच राशींना होणार आहे. करिअर, आर्थिक आणि सामाजिक पातळीवर दिवस उत्तम जाणार आहे. कोणत्या आहेत या राशी जाणून घेऊया.

मेष रास :

मेष राशीच्या लोकांना आजचा दिवस सामाजिक पातळीवर उत्तम जाणार आहे. तुमची ओळख वाढेल. बाहेरच्या कामाबरोबर घरगुती जबाबदाऱ्याही उत्तम सांभाळाल. नोकरीच्या ठिकाणी तुमचा सन्मान वाढेल. आर्थिक बाबतीत चांगल्या संधी मिळतील. तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. नवीन जबाबदारी मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवाल.

उपाय- आज पाण्यात काळे तीळ टाकून पिंपळाच्या झाडाला अर्पण करा.

कर्क रास :

आजच्या दिवसामध्ये चंद्र तुमच्या कर्म भावात संचार करणार आहे. तर त्याबरोबर सूर्य आणि शुक्राचीही साथ असेल. त्यामुळे करिअरमध्ये तुमचा प्रभाव वाढेल. घरात आणि बाहेर विरुद्ध लिंगी व्यक्तीची साथ मिळेल. घरात चांगला वेळ घालवाल. कुटुंबाची साथ मिळेल. करिअरमध्ये प्रगती होईल. एखादी महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल.

उपाय - आजच्या दिवशी हनुमान चालीसेचा पाठ करा.

तूळ रास :

तूळ राशीच्या लोकांना आजचा दिवस छान जाईल. कुटूंबात आनंदाचे वातावरण असेल. जोडीदाराशी जवळीक वाढेल. एखादी अशी इच्छा पूर्ण कराल जिची तुम्ही बराच काळ वाट पाहत होता. समाजात प्रभाव वाढेल. एखादी छोटा किंवा मोठा प्रवास कराल. एखाद्या आवडीच्या गोष्टींची खरेदी कराल.

उपाय - तूळ राशीच्या लोकांनी आज श्रीसूक्ताचे पठण करा.

धनु रास :

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मनोरंजक असेल. आजचा दिवस आनंदात घालवाल. कोणत्यातरी ओळखीच्या मदतीने तुमची अडचण दूर होईल. करिअरमध्ये कलेचा फायदा होतील. आर्थिक लाभ सामान्य असेल. घरात कुणीतरी पाहुण्याचं आगमन होईल. मुलांच्या बाबतीत चांगली बातमी मिळेल.

उपाय - आज शनी स्तोत्राचं पठण करा.

मीन रास :

मीन राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला जाईल. मेहनत अधिक असेल. दिवस आनंदात जाईल. कोणत्यातरी महत्त्वाच्या कामात प्रसन्नता मिळेल. एखादी दूरगामी योजना बनवाल. आर्थिक बाबतीत दिवस सामान्य जाईल. कुटूंबाची साथ मिळेल.एखाद्या अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शन मिळेल.

उपाय - उद्या एखाद्या सफाई कर्मचाऱ्याला अन्नदान करा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

यंदाचा मे महिना 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजर ! ट्रिपल राजयोगाचा फायदा, पैशांची बरसात आणि करिअरमध्येही होणार प्रोमोशन
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.