38124
श्री देव सत्पुरुष
38125
श्री देवी भराडी
गोवेरी श्री सत्पुरुष, भराडी
वर्धापन दिन सोहळा आज
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १८ ः गोवेरी येथील श्री देव सत्पुरुष व श्री देवी भराडीचा वर्धापन दिन सोहळा उद्या (ता. १९) साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ७ वाजता देव आणणे, ७.३० वाजता दोन्ही मंदिरांत अभिषेक, ९ वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वाजता आरती, महाप्रसाद, ४ वाजता भाऊ नाईक यांचे सुश्राव्य कीर्तन, सायंकाळी ७ वाजता सुहासिनींच्या हस्ते देवाला औक्षण, महाआरती, रात्री ८ वाजता ग्रामस्थांची भजने, ८.३० वाजता सद्गुरू वारकरी दिंडी मंडळाचे (कुडाळ) भजन, १०.३० वाजता ‘श्रीं’चा पालखी सोहळा, १२ वाजता नाईक-मोचेमाडकर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन सत्पुरुष व भराडी देवस्थान समितीने केले आहे.