नालासोपाऱ्यात धक्कादायक प्रकार! सासरच्या मंडळींकडून महिलेला बेदम मारहाण, घटना CCTV मध्ये कैद
प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा April 18, 2026 11:13 PM

Nalasopara Crime News :  वसई-विरार परिसरातील नालासोपारा पूर्व येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शांती लाईफ या इमारतीत एका महिलेला तिच्याच सासरच्या मंडळींकडून बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सदर महिलेच्या म्हणण्यानुसार, सासू, सासरे, दोन नणंद, देवर आणि नणंदेचे पती असे कुटुंबीय गेल्या 13 वर्षांपासून हुंड्याच्या पैशांसाठी तिला त्रास देत असून वारंवार मारहाण करत आहेत.

या घटनेमुळे परिसरात संताप

नालासोपारा पूर्व येथील शांती लाईफ इमारतीमध्ये राहणाऱ्या एका महिलेवर तिच्याच सासरच्या मंडळींकडून मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सदर महिलेच्या म्हणण्यानुसार, सासू, सासरे, दोन नणंद, देवर आणि नणंदेचे पती असे कुटुंबीय गेल्या 13 वर्षांपासून हुंडा देण्याच्या मागणीसाठी तिला त्रास देत असून वारंवार मारहाण करत आहेत. महिला तिच्या पती आणि लहान मुलीसह त्याच इमारतीतील वेगळ्या फ्लॅटमध्ये राहत असून, ती शिक्षक म्हणून काम करते आणि घरातच मुलांना शिकवणी देते. मात्र, या कुटुंबीयांनी थेट तिच्या विद्यार्थ्यांसमोरच तिच्यावर हल्ला केल्याचा आरोप असून, या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

 मारहाणीचा संपूर्ण प्रकार इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

या मारहाणीचा संपूर्ण प्रकार इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचे फुटेज आता समोर आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मला हुंडा देण्याच्या कारणावरून त्रास दिला जात आहे. आता त्यांनी थेट माझ्या विद्यार्थ्यां समोरच मला मारहाण केली आहे. आतापर्यंत हे सगळं घरात होतं, तोपर्यंत मी सहन करत होते. पण आता ते घराबाहेरही मला बिनधास्त मारहाण करत आहेत. माझ्या जीवाला धोका आहे. कोर्टात केस सुरू आहे. यूपी आणि मुंबई दोन्हीकडे. तरीही त्यांना कुठलीही भीती नाही. मला न्याय हवा आहे अशी माहिती या महिलेने दिली आहे. या घटनेनंतर संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. पोलिसांनी या प्रकरणात नेमकी काय कारवाई केली आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या 13 वर्षांपासून हुंडा देण्याच्या मागणीसाठी तिला त्रास देत असून वारंवार मारहाण करत आहेत. महिला तिच्या पती आणि लहान मुलीसह त्याच इमारतीतील वेगळ्या फ्लॅटमध्ये राहत असून, ती शिक्षक म्हणून काम करते आणि घरातच मुलांना शिकवणी देते. दरम्यान, या घटनेमुळं संताप व्यक्त होत आहे. 

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.