नवी दिल्ली : जागतिक आर्थिक घडामोडींमध्ये भारतासाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंटरनॅशनल मॉनेटरी फंड (IMF) च्या ताज्या अहवालानुसार भारत (India) आता जगातील सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. यापूर्वी काही काळासाठी भारत चौथ्या स्थानावर पोहोचल्याची चर्चा होती. आता भारताला जर्मनी आणि युनायटेड किंगडमने मागे टाकलं आहे.
या अहवालानुसार भारताची जीडीपी (Gross Domestic Product GDP) सुमारे 2.25 ट्रिलियन डॉलर इतकी आहे. मात्र डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे भारताच्या जागतिक क्रमवारीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
IMF च्या आकडेवारीनुसार भारतापुढे पाच मोठ्या अर्थव्यवस्था आहेत. त्यामध्ये अमेरिका (United States), चीन (China), जपान (Japan), जर्मनी (Germany) आणि युनायटेड किंगडम (United Kingdom) यांचा समावेश आहे. भारत सध्या सहाव्या स्थानावर आहे.
भारताच्या पुढे कोणत्या अर्थव्यवस्था?
1. अमेरिका
2. चीन
3. जपान
4. जर्मनी
5. युनायटेड किंगडम
6. भारत
तज्ज्ञांच्या मते, रुपया डॉलरच्या तुलनेत कमकुवत झाल्याने आयात महाग होते आणि त्याचा थेट परिणाम व्यापार तुटीवर होतो. जर रुपया स्थिर राहिला असता, तर भारताची जागतिक क्रमवारी अधिक चांगली राहू शकली असती.
भारतासमोर सध्या दोन मोठी आव्हाने आहेत. पहिले म्हणजे जीडीपी वाढ दर 7 ते 8 टक्क्यांच्या दरम्यान कायम ठेवणे आणि दुसरे म्हणजे रुपयातील अस्थिरता नियंत्रित करणे. या दोन्ही गोष्टी साध्य झाल्यास भारत पुन्हा उच्च क्रमांकावर पोहोचू शकतो.
एस अँड पी ग्लोबल रेटिंग्स (S&P Global Ratings) नुसार, कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या तरी भारताची अर्थव्यवस्था सुमारे 6.3 टक्क्यांनी वाढू शकते. जर तेलाच्या किमती 85 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास राहिल्या, तर 2026-27 मध्ये वाढ दर 7.1 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो.
जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवरही भारताची अर्थव्यवस्था इतर प्रमुख देशांच्या तुलनेत मजबूत राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दीर्घकालीन आर्थिक सुधारणा आणि धोरणात्मक निर्णयांमुळे भारताची प्रगती कायम राहील, असे तज्ज्ञांचे मत आहे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा