राज्यासह संपूर्ण देशात उष्णतेची लाट आली आहे. कडक उन्हात कुठेही बाहेर गेल्यावर खूप थकवा जाणवतो. काही वेळा आहारात मसालेदार किंवा तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्याने शरीराची पचनक्रिया बिघडते. पचनसंस्था बिघडल्यानंतर पोटात जळजळ, आम्लपित्त, अपचन, उलट्या, मळमळ अशी अनेक लक्षणे दिसतात. त्यामुळे उन्हाळा सुरू झाल्यानंतर अतिउष्ण पदार्थांचे सेवन अजिबात करू नये. उन्हात कुठेही बाहेर गेल्यावर फ्रीजमधलं थंड पाणी प्यायलं जातं. यामुळे फक्त तहान शमते पण शरीराला फारसा फायदा होत नाही. शरीरातील अंतर्गत उष्णता वाढल्यानंतर अति घाम येणे, उष्णता वाढल्याने लघवीला त्रास होणे आदी समस्या वाढतात. त्यामुळे पोटातील वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी पुदिन्याच्या पानांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीने थंडगार पुदिन्याच्या पानांचे सरबत कसे बनवायचे ते सांगणार आहोत. अशा प्रकारे बनवलेले सरबत उन्हाळ्यासाठी योग्य आहे. पुदिन्याची पाने नियमित चघळल्याने पोट थंड राहते. जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – पिंटरेस्ट)
दिवसाची सुरुवात मस्त डिशने करा! चिया-मँगो स्मूदी ५ मिनिटात बनवा, रेसिपी लक्षात ठेवा
हवामानातील बदलांमुळे वारंवार आजारी पडतात? रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी टोमॅटो रसमचा आहारात समावेश करा