GT vs MI Toss : गुजरात विरुद्धही रोहित शर्मा आऊट, मुंबईकडून दोघांचं पदार्पण, बॅटिंग कुणाची?
GH News April 20, 2026 10:12 PM

आयपीएल 2026 मधील (IPL 2026) 30 व्या सामन्यात 2 चॅम्पियन्स संघ आमनेसामने आहेत. गुजरात टायटन्स शुबमन गिल याच्या नेतृत्वात हार्दिक पंड्या याच्या कॅप्टन्सीतील मुंबई इंडियन्स विरुद्ध 2 हात करण्यासाठी सज्ज झाली आहे. दोन्ही संघांचा हा या मोहिमेतील सहावा सामना आहे. उभयसंघातील सामन्याला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. गुजरात टायटन्सने टॉस जिंकला आहे. कॅप्टन शुबमन गिल याने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.

प्लेइंग ईलेव्हन अपडेट

होम टीम गुजरातने प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर दुसऱ्या बाजूला मुंबईने प्लेइंग ईलेव्हनध्ये एकूण 4  बदल केले  आहेत. मुंबईकडून दोघांना पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. दानेश मालेवार आणि कृष भगत याचा समावेश करण्यात आला आहे. कृषला दुखापतीमुळे बाहेर झालेल्या अथर्व अंकोलेकर याच्या जागी मुंबई संघात स्थान देण्यात आलं आहे.

अहमदाबादमधील 2026 पासूनची आकडेवारी

अहमदाबादमध्ये 2026 वर्षांत एकूण 9 पैकी 5 सामन्यांत पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमचा विजय झालाय. तर 3 वेळा विजयी धावांचा पाठलाग करणारी टीम यशस्वी ठरली आहे.

मुंबई इंडियन्सची अहमदाबादमधील कामगिरी

मुंबई इंडियन्सने अहमदाबादमध्ये एकूण 7 सामने खेळले आहेत. मुंबईने त्यापैकी एकमेव सामना जिंकला आहे. मुंबईचा या मैदानातील एकमेव विजय तोही 2014 साली आला होता. तसेच मुंबईला 6 वेळा पराभूत व्हावं लागलंय.

पलटण गुजरात विरुद्ध अपयशी

तसेच मुंबईची या मैदानातील गुजरात टायन्टस विरुद्धची कामगिरीही निराशाजनक राहिली आहे. मुंबईला गुजरात विरुद्ध या मैदानातील चारही सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. त्यामुळे मुंबई गुजरात विरुद्ध पहिला आणि नरेंद्र मोदी स्टेडियममधील एकूण दुसरा विजय मिळवणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दोन्ही संघांची कामगिरी

दरम्यान पॉइंट्स टेबलमध्ये गुजरात सहाव्या आणि मुंबई दहाव्या स्थानी आहे. दोन्ही संघांचा हा सहावा सामना आहे. गुजरातने 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तर मुंबईला 5 पैकी फक्त 1 सामनाच जिंकता आला आहे.

गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कॅप्टन), साई सुदर्शन, जोस बटलर (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, शाहरुख खान, रशीद खान, मोहम्मद सिराज, कागिसो रबाडा, प्रसीद कृष्णा आणि अशोक शर्मा.

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : दानिश मालेवार, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), तिलक वर्मा, शेरफेन रदरफोर्ड, मिचेल सँटनर, क्रिश भगत, जसप्रीत बुमराह, अल्लाह गझनफर.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.