Bhoot Bangla OTT release date Netflix: प्रियदर्शन दिग्दर्शित आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) अभिनीत 'भूत बंगला' (Bhoot Bangla) अखेर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या हॉरर कॉमेडी (Comedy Film) चित्रपटाची प्रदर्शनापूर्वीपासून बरीच चर्चा रंगली होती. हा चित्रपट आता सिनेमागृहात (Entertainement) रिलीज झाला असून, या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तीन दिवसांत उत्तम कामगिरी केली आहे. प्रेक्षक आणि खास अक्षय कुमारचे चाहते हा सिनेमा आवर्जून सिनेमागृहात जाऊन पाहत आहेत. या सगळ्यात, चित्रपटगृहांमधील प्रदर्शनानंतर हा सिनेमा कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. 'भूत बंगला' हा सिनेमा कुठे आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार? हे जाणून घेऊयात.
जेव्हा एखादा सिनेमा सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होतो, तेव्हा ओटीटी स्ट्रीमिंग हक्कांविषयी चर्चा सुरू होते. 'भूत बंगला' सिनेमागृहांमध्ये रिलीज तर झाला, आता हा सिनेमा कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार? याकडे सर्वांचेच लक्ष आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुमार स्टारर 'भूत बंगला' हा चित्रपट थिएटरमधील प्रदर्शन पूर्ण झाल्यावर नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. नेटफ्लिक्स हे 'भूत बंगला' या चित्रपटाचे डिजिटल स्ट्रीमिंग पार्टनर आहे. त्यामुळे 'भूत बंगला' हा सिनेमा Netflixवर प्रदर्शित होणार ही माहिती समोर आली आहे.
View this post on Instagram
दरम्यान, 'भूत बंगला' या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाच्या तारखेबद्दल अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही. दरम्यान, हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यानंतर अगदी एक ते दीड महिन्यांत ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकतो, असe अंदाज काहींनी वर्तवला आहे. अक्षय कुमारचा 'भूत बंगला' हा सिनेमा जून किंवा जुलाई महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या: