कधीकाळी ज्या अभिनेत्याची हिरोइन बनली, 5 वर्षांनी खऱ्या आयुष्यात त्यांच्याच स्टार मुलासोबत थाटला संसार, आज लेक बॉलिवूडचा हँडसम हंक; ओळखलं का कोण?
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क April 21, 2026 09:43 AM

Bollywood Actress Struggle Life: बॉलिवूडमध्ये (Bollywood News) अनेक प्रतिष्ठित कुटुंब आहेत, ज्यांच्या अनेक पिढ्यांनी रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवलं. आजही त्यांच्या पिढ्या रुपेरी पडदा गाजवताना दिसतात. अनेकांचा तर, आजही बॉलिवूडच्या टॉप सेलिब्रिटींच्या (Bollywood Top Celebrity List) लिस्टमध्ये समावेश होतो. असंच एक बॉलिवूडमधलं प्रसिद्ध आणि दिग्गज कुटुंब म्हणजे, कपूर कुटुंब (Kapoor Family). कधीकाळी असा समज होता की, यांच्या कुटुंबातील लेकी आणि सुना फिल्म इंडस्ट्रीत काम करत नाही. पण, कालांतरानं कपूर कुटुंबातील लेकी-सूनांनी कुटुंबाच्या या चौकटी आणि, रुढी-परंपरांना छेद देत, दणक्यात बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि अख्खी इंडस्ट्री हादरवून सोडली. आज त्यांना इंडस्ट्रीत कपूर कुटुंबामुळे नाहीतर त्यांच्या नावामुळे ओळखलं जातं. त्यांची नावं सांगायची झालीच तर, करिना कपूर (Kareena Kapoor), करिष्मा कपूर (Karisma Kapoor) आणि आलिया भट्ट-कपूर (Alia Bhatt)...  तर, कपूर कुटुंबाच्या काही सुनबाई लग्नापूर्वी सुपरस्टार अभिनेत्री होत्या, पण लग्नानंतर त्यांना रुपेरी पडदा सोडावा लागला. पण, कधीकाळी त्यांनी इंडस्ट्रीला अनेक दमदार आणि सुपरहिट सिनेमे दिलेत. आम्ही ज्यांच्याबाबत बोलतोय, त्यांचं नाव स्टार अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor). 

70 आणि 80 च्या दशकात फिल्म इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध आणि सुपरस्टार अभिनेत्री म्हणजे, नीतू कपूर. त्यांनी कपूर कुटुंबाचा लेक आणि दिग्गज अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांच्यासोबत 1980 साली विवाह केला. पण, लग्नाआधी त्या ऋषी कपूर (Veteran Actor Rishi Kapoor) यांचे काका शशी कपूर (Shashi Kapoor) यांच्यासोबतच पडद्यावर रोमँटिक भूमिकेत झळकल्या होत्या. एका फिल्ममधलं त्यांचं रोमँटिक गाणं खूपच गाजलेलं आणि फिल्मही ब्लॉकबस्टर ठरलेली. या फिल्ममधले काही डायलॉग्स आजही कित्येक चाहत्यांच्या तोंडून ऐकायला मिळतात. 

Kah Doo Tumhe Ya Chup Rahu (Deewaar) - TheSongPedia

1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दीवार' (Deewaar Movie) या सिनेमातून नीतू कपूर यांनी शशी कपूर यांच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. 'कह दूं तुम्हें या चुप रहूं' (Kehdoon Tumhen Ya Chup Rahun Song) या गाण्यात दोघांची जोडी प्रेक्षकांना विशेष भावलेली आणि त्यांच्या केमिस्ट्रीची मोठी चर्चा झाली होती. हा सिनेमा सुपरहिट ठरला आणि महत्त्वाचं म्हणजे, शशी कपूर आणि नीतू सिंह यांच्या जोडीची जोरदार चर्चा झाली. विशेष म्हणजे, हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर अवघ्या पाच वर्षांतच नीतू कपूर यांनी शशी कपूर यांच्या पुतण्याशी, म्हणजेच, ऋषी कपूर यांच्याशी लग्न केलं आणि त्या कपूर कुटुंबाच्या सूनबाई बनल्या. त्यामुळे शशी कपूर त्यांचे चुलत सासरे झाले. शशी कपूर नीतू सिंह यांचे चुलत सासरे आणि ऋषी कपूर यांचे वडील राज कपूर यांचे सर्वात लहान भाऊ होते. 

The Rishi-Neetu love story

ऋषी कपूर आणि नीतू सिंह यांची लव्हस्टोरी 

नीतू कपूर यांनी 1980 मध्ये ऋषी कपूर यांच्याशी लग्न केलं. शशी कपूर यांच्यासोबतचा सुपरहिट सिनेमा 'दीवार' (1975) रिलीज झाल्यानंतर तब्बल 5 वर्षांनी नीतू सिंह यांनी ऋषी कपूर यांच्याशी लग्न केलं. या फिल्ममध्ये त्यांनी अमिताभ बच्चन, शशि कपूर आणि परवीन बाबी यांच्यासोबत स्क्रिन शेअर केलेली. ऋषी कपूर आणि नीतू सिंह या जोडीनं तब्बल 10 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. एकत्र काम करताना दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर, नीतू सिंह-कपूर यांनी आपल्या संसाराला अधिक महत्त्व देण्याचा निर्णय घेतला आणि आपोआपच रुपेरी पडद्यापासून दुरावल्या. दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि नीतू सिंह यांना दोन मुलं आहे. रिद्धिमा कपूर आणि रणबीर कपूर. 

Godfather Fame Actor Al Pacino Life Story: 85 वर्षांचा सुपरस्टार, 32 वर्षांची गर्लफ्रेंड अन् दोन वर्षांचा मुलगा; सिनेसृष्टीच्या 'गॉडफादर'चे अफेअर्सही सतराशे साठ, ओळखलं का कोण?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.