तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?
Saam TV April 22, 2026 01:45 AM

संघर्ष गांगुर्डे | साम टीव्ही न्यूज | डोंबिवली

Kalyan WhatsApp harassment case woman traps accused : सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवून तरुणींना जाळ्यात ओढण्याल्याच्या घटना मुंबई, पुण्यासह देशभरातून समोर येत आहेत. यातच आता डोंबिवलीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्हॉट्सॲपवर चॅटिंग करून एका अनोळखी तरुणीला लॉजमध्ये भेटण्यासाठी तगादा लावला. त्या तरूणीला पैशांचे आमिषही दाखवण्यात आले होते. वैतागलेल्या तरूणीने जावेद खानला नातेवाईकांच्या मदतीने चांगलाच धडा शिकवला.

जावेद खान हा मुंब्रायेथील शिळफाटा परिसरात राहणारा विवाहित व्यावसायिक आहे. त्याने वांगणी येथील एका तरुणीशी व्हॉट्सॲपवर संपर्क साधला. जावेद त्या तरूणीला पैशांचे आमिष दाखवून लॉजमध्ये बोलवत होता. तरूणीकडून नकार असतानाही वारंवार तो तिला बोलवत होता. कोणतीही ओळख नसताना अशा प्रकारचा अश्लील प्रस्ताव आल्याने तरुणी सतर्क झाली. तिने कुटुंबाच्या मदतीने त्याला चांगलाच धडा शिकवला.

कोल्हापुरात खळबळ! व्याजाच्या पैशाच्या बदल्यात जबरदस्तीनं शरीरसंबंध; महिलेला हॉटेलवर नेलं, विविस्त्र व्हिडिओ काढले

जावेद खान याच्या या भयंकर कृत्याबाबत तरुणीने लगेच आपल्या नातेवाईकांना सांगितलं. त्यानंतर नातेवाईकांनी सापळा रचून जावेद खानला भेटण्यासाठी बोलावले. ठरलेल्या ठिकाणी येताच नातेवाईकांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला. नातेवाईकांनी जावेद याला पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी जावेद खानला अटक केली आहे. पोलिसांनी जावेद याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

HSC, SSC Result: बारावी बोर्डाचा निकाल कधी जाहीर होणार? mahresult.nic.in वर डाउनलोड करा मार्कशीट
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.