'धुरंधर 2' नाही, 'ही' फिल्म 2026 ची 'मोस्ट प्रॉफिटेबल मूव्ही'; 2 तास 20 मिनिटं पापणीही पडू देणार नाही, IMDb रेटिंगही धमाकेदार
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क April 22, 2026 10:43 AM

Youth Film Trending On Netflix: सिनेमा (Hindi Film) हीट करण्याचं सोपं गणित म्हणजे, तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरायला हवा. सिनेमाची स्टोरी, त्यातली स्टारकास्ट आणि त्यातले संवाद यांचा योग्य संगम घडवून आणला की, सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार, यात काही शंका नाही. असे अनेक सिनेमे आहेत, जे कल्ट सिनेमे म्हणून ओळखले जातात. तर, आता येत असलेले अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या मनात घर करतात. तुम्हाला आता जर कुणी विचारलं? 2026 चा 'मोस्ट प्रॉफिटेबल मूव्ही' कोणता? तर, कदाचित आपल्यापैकी अनेकजण एका सूरातच 'धुरंधर 2' (Dhurandhar 2) असंच म्हणतील. पण, आता जर मी तुम्हाला सांगितलं की, 'धुरंधर 2' 2026 चा 'मोस्ट प्रॉफिटेबल मूव्ही' (Most Profitable Movie) नाही. तर, तुम्ही विश्वास ठेवाल...? खरंच 'धुरंधर 2' हा 2026 मधल्या सर्वात यशस्वी आणि मोठा नफा मिळवणारा सिनेमा नाही. तर, सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) धुमाकूळ घालणारा एक सिनेमा 2026 चा 'मोस्ट प्रॉफिटेबल मूव्ही' (Most Profitable Movie Of 2026) आहे. या सिनेमानं 'धुरंधर 2'ला टक्कर देऊन हे टायटल आपल्या नावे केलं आहे. 

ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला नवे सिनेमे रिलीज होत असतात, त्यापैकी काही सिनेमे येताच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. सध्या अशीच एक फिल्म चर्चेत आहे. अवघ्या 2 तास 20 मिनिटांची ही फिल्म असून तिची दमदार कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवतेय. त्यामुळेच ती अल्पावधीतच लोकांच्या पसंतीस उतरली आहे. या सिनेमाचं IMDb रेटिंगही दमदार आहे.

OTT गाजवतेय 'ही' फिल्म

'धुरंधर 2'ला मागे टाकून 2026 मधला सर्वाधिक नफा मिळवणाऱ्या सिनेमाचा बहुमान मिळवणाऱ्या सिनेमाचं नाव आहे, 'यूथ' (Youth). हा एक तमिळ सिनेमा (Tmail Movie) आहे. 19 मार्च रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज करण्यात आलेला. त्यानंतर 16 एप्रिलला नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आला आणि काही दिवसांतच हा सिनेमा ट्रेंडिंगमध्ये अव्वल स्थानी पोहोचला. नेटफ्लिक्सच्या टॉप 10 यादीत 'यूथ' सिनेमानं पहिल्या क्रमांकावर झेप घेतलीय. हा सिनेमा हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा विविध भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्याला IMDb वर 7.1 रेटिंग मिळालं आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Netflix India (@netflix_in)

'यूथ' सिनेमाची कथा नेमकी काय? 

तमिळ सिनेमा असलेल्या 'यूथ' सिनेमाची कथा प्रवीण नावाच्या 15 वर्षांच्या मुलाभोवती फिरते. दहावीच्या परीक्षेत कसाबसा पास झाल्यानंतर तो अकरावीत प्रवेश घेतो आणि त्याच्यासाठी 'परफेक्ट' प्रेमाच्या शोधात असतो. या शोधात त्याला बऱ्याचदा आकर्षण, प्रेम आणि ब्रेकअपचा अनुभव येतो. पालकांचे कठोर नियम आणि शाळेतली मजामस्ती यांमध्येच त्याच्या हातून एक मोठी गोष्ट घडले आणि नेमकी हीच गोष्ट त्याच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणते. त्याच्या याच चुकीमुळे त्याला जबाबदारीची जाणीव होते.  

ओटीटी पर तहलका मचा रही 2 घंटे 20 मिनट की ये तमिल फिल्म, 2026 की है मोस्ट प्रोफेटेबल मूवी

फिल्मचं बजेट आणि कलेक्शन 

'यूथ' सिनेमानं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केलीय. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, 6 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या फिल्मनं इंडियन बॉक्स ऑफिसवर 52.26 कोटींची कमाई केलीय. तर, वर्ल्डवाईड या सिनेमानं 71.33 कोटींची कमाई केलीय. कोईमोईनं दिलेल्या माहितीनुसार, या फिल्मनं 2026 मधल्या 'मोस्ट प्रॉफिटेबल मूव्ही'चा टॅगही मिळवलाय. 

फिल्ममधल्या कास्टबाबत बोलायचं तर, 'यूथ' सिनेमात मुख्य भूमिकेत केन करुणास आहे, ज्यानं याच सिनेमातून तमिळ सिनेमात डेब्यू केलाय. यासोबतच फिल्ममध्ये सूरज वेंजरामूडू, देवदर्शिनी, अनिष्मा अनिलकुमार आणि प्रियांशी यादव यांसारखे कलाकार झळकले आहेत.  

Dhurandhar 2 vs Vaazha 2: ना कोणता बडा हिरो, ना हिरोईन; तरीसुद्धा 'धुरंधर 2'ला पाजलं पाणी, 'या' फिल्मनं बजेटच्या 20 पट केलीय कमाई

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.