इराण आणि अमेरिका युद्धात होर्मुजची खाडी युद्धाचा आखाडा बनली आहे. इराण होर्मुज खाडीतून माघार घेत नाही. परिणामी होर्मुज खाडी ठप्प आहे. होर्मुज खाडीतून जहाजांची ये-जा होत नसल्याने तेलासह एलपीजीचे मोठे संकट आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये होर्मुज खाडी खुली आणि सुरक्षित व्हावी, याकरिता प्रयत्न केले जात आहेत. भारतासह अनेक देशांचे जहाज होर्मुज खाडीत अडकून पडले आहेत. इस्त्रायल आणि अमेरिकेने मोठा हल्ला इराणवर केला. त्यानंतर युद्धाला सुरूवात झाली. युद्धाला सुरूवात होताच अचानक इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने जागतिक बाजार अस्थिर झाला. हेच नाही तर तेलाच्या भावांमध्ये मोठी वाढ होत आहे. होर्मुज खाडीत भारताचे 14 जहाज अडकले आहेत. या जहाजांच्या सुरक्षेसाठी भारत सरकार इराणी अधिकाऱ्यांसोबत सतत संपर्कात आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने भारतात एलपीजीचे मोठे संकट आहे.
आता भारतासाठी अत्यंत मोठी बातमी पुढे येताना दिसत आहे. होर्मुजच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताला आणखी एक दिलासादायक बातमी मिळाली आहे. होर्मुजची सामुद्रधुनी ओलांडून आणखीन एक जहाज भारतात दाखल होत आहे. इराणने भारतीय जहाजावर गोळीबारी केली. मात्र, तरीही या जहाजाला रोखण्यात त्यांना यश मिळाले नाही.
भारतीय ध्वज असलेल्या जहाजाला गोळीबारी करूनही रोखण्यात इराणला यश मिळाले नाही. 18 एप्रिल रोजी या जहाजाने होर्मुज खाडी पार केली. हे भारतीय तेलवाहू जहाज ‘देश गरिमा’ बुधवारी दुपारपर्यंत मुंबईत दाखल होईल. या जहाजावर 31 भारतीय खलाशी आहेत. हे जहाज मुंबईत दाखल होताच मोठा दिलासा मिळणार आहे.
भारतीय ध्वज असलेल्या देश गरिमा या टँकर जहाजाने 18 एप्रिल रोजी होर्मुजची सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार केली. दुसरीकडे आयआरजीसीच्या गोळीबारानंतर व्हीएलसीसी सन्मार हेराल्ड आणि मालवाहू जहाज जॅग अर्णव या दोन भारतीय जहाजांना माघारी फिरावे लागले. जहाजावर झालेल्या गोळीबारामध्ये एकही व्यक्ती जखमी झाली नाही. इराणच्या गोळीबारानंतरही कॅप्टनने हार मानली नाही. आता हे जहाज सुरक्षित दाखल होईल.