MI vs CSK Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) स्पर्धेत ३३ वा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (MI vs CSK) संघात रंगणार आहे. दोन सर्वात यशस्वी संघांमध्ये होणार्या या सामन्याकडे अनेकांचे लक्ष आहे. हा सामना नेहमीच चर्चेत असतो.
या सामन्यावेळी दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्येही जुगलबंदी पाहायला मिळते. पण असे असले तरी सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये मात्र भाईचारा पाहायला मिळत आहे. नुकताच एमएस धोनी आणि दीपक चाहर (MS Dhoni & Deepak Chahar) यांच्यातील गमतीशीर व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
IPL 2026: CSK विरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्फोटक फलंदाजी करणारा खेळाडू संघात दाखलएमएस धोनी आयपीएल २०२६ स्पर्धेत अद्याप खेळलेला नाही, तो पोटरीच्या दुखापतीतून सावरत होता. पहिल्या ५ सामन्यांत तर त्याने संघासोबत प्रवासही केला नव्हता. मात्र आता त्याने सरावाला सुरुवात केली आहे. त्याने मुंबईत नेट्समध्ये फलंदाजीसोबतच यष्टीरक्षणाचाही सराव केला. त्यामुळे तो मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यातून पुनरागमन करू शकतो, अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सामन्यापूर्वी सरावादरम्यान धोनी मस्तीच्या मूडमध्ये दिसला. तो सराव करत असताना मुंबई इंडियन्सचा भाग असलेला वेगवान गोलंदाज दीपक चाहर अचानक त्याच्या जवळ गेला. त्यावेळी त्याला पाहिलं आणि त्याच्यामागे आलेल्या कॅमेरामनलाही धोनीने पाहिलं आणि तो गमतीने म्हणाला, 'तू आला आणि सोबत कॅमेरा पण घेऊन आलास.' ते पाहून दीपक कॅमेरामनला जायला सांगतो. धोनी त्याला पुढे म्हणतो की 'आपल्याला बोलता येत नाही ना.'
यानंतर दीपक मस्तीमध्ये धोनीच्या पायाही पडताना दिसला, ज्यावर धोनी लगेचच मागे हटतो. त्यानंतर दोघेही मजा-मस्ती करताना दिसले. या व्हिडिओवर लाईक्सचा पाऊस पडत असून अनेक चाहत्यांच्या प्रतिक्रियाही येत आहेत.
खरंतर दीपक चाहर आणि धोनी यांच्यात मैदानाबाहेरही फार चांगले बाँडिंग आहे. त्यांनी चेन्नईसाठी एकत्र सामने खेळले आहेत. दीपक २०१८ ते २०२४ दरम्यान चेन्नई सुपर किंग्सचा भाग होता. त्याने चेन्नईसाठी चांगली कामगिरीही केली होती. पण त्यानंतर चेन्नईने त्याला २०२५ आयपीएलपूर्वी संघातून रिलीज केले. त्यानंतर चेन्नईने त्याला लिलावातून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्यावर मोठ्या रकमेची बोली लागत असल्याने त्याला घेता आले नाही.
IPL 2026: CSK संघाला उधारीवर खेळाडू देणार RCB? अश्विनने सुचवलाय मार्ग, पण नेमका Loan चा नियम आहे काय?लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की दीपकचा चुलत भाऊ राहुल चाहर सध्या चेन्नई सुपर किंग्सच्या संघाचा भाग आहे. तो यापूर्वी मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. आता या दोन भावांना गुरुवारी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली, तर त्यांच्याचाही सामना पाहायला मिळणार आहे.