दुबईला ‘सिटी ऑफ गोल्ड’ असे म्हटले जाते. इथे सोन्यावर खूप कमी टॅक्स लागतो. शिवाय, पर्यटकांना तर खरेदीवर काही प्रमाणात टॅक्स परतही मिळतो. यामुळेच दुबईहून भारतात येणाऱ्या लोकांच्या बॅगेत एखादं तरी सोन्याचं नाणं असतंच.
हाँगकाँग आणि सिंगापूर या दोन देशांमध्ये जर तुम्ही सोन्याचे कॉईन किंवा बिस्कीट घेतले, तर सरकार त्यावर कोणताही जास्तीचा टॅक्स (GST) लावत नाही. म्हणजे निव्वळ सोन्याचे भाव द्या आणि सोनं घरी न्या, असा नियम आहे. यामुळे गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हे देश म्हणजे नंदनवनच आहेत.
तुम्ही चॉकलेटसाठी स्वित्झर्लंड ओळखत असाल, पण हा देश सोन्याच्या शुद्धीकरणाचे (Refining) मोठे केंद्र आहे. जिथे सोनं बनतं तिथेच घेतलं की ते स्वस्त पडतं. त्यामुळे भरपूर साठा असल्याने इथे भाव थोडे कमीच असतात.
थायलंडचे सराफा व्यापारी खूप कमी नफा ठेवून सोनं विकतात. तिथे सोन्याची देवाणघेवाण इतकी फास्ट असते की कमी किंमतीतही त्यांचा चांगला धंदा होतो. परदेशात सोनं स्वस्त मिळतं म्हणून कितीही सोनं विमानाने आणता येत नाही.
भारतात येताना कस्टम ड्युटीचे नियम कडक आहेत. जर मर्यादेबाहेर सोनं आणलं, तर विमानतळावर टॅक्स भरताना नाकी नऊ येऊ शकतात. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी नियम नक्की तपासा.