आज रात्री पार्टी करूया का? किंवा रात्री थोडी थोडी घेऊया…असे संवाद आपण अनेकदा ऐकतो. दारुचा विषय निघाला की, डोळ्यांसमोर आपोआप रात्रीचीच वेळ येते. दुपारी किंवा सकाळी दारु पिणाऱ्यांकडे समाज संशयाने पाहतो.
पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की असंख्य दारु प्रेमी हे दारु पिण्यासाठी रात्री ८ चीच वेळ निवडतात. ही ८ ची वेळ जगभरात इतकी लोकप्रिय का आहे? यामागे केवळ काही रंजक सामाजिक, मानसिक आणि वैज्ञानिक कारणे दडलेली आहेत.
हा वेळ व्यावसायिक जबाबदाऱ्या आणि वैयक्तिक वेळ यातील एक महत्त्वाचा ब्रेक ठरतो. जपानसारख्या देशात तर ऑफिसचे टेन्शन घालवण्यासाठी सहकाऱ्यांसोबत रात्री ड्रिंक्स घेणे ही एक पद्धतच आहे.
भारतात रात्री ९ ते १० च्या दरम्यान जेवण करण्याची पद्धत आहे. ८ वाजता मद्यपान सुरू केल्यास जेवणाआधी साधारण एक ते दीड तासाचा वेळ मिळतो. हा सोशल प्राइम टाइम मित्र-मैत्रिणींना एकत्र येण्यासाठी आणि गप्पा मारण्यासाठी अत्यंत सोयीस्कर ठरतो.
रात्री ८ ही वेळ मित्रमैत्रिणींना एकत्र येण्यासाठी सोयीस्कर असते. या वेळेपर्यंत घरातील कामे आटोपलेली असतात आणि दुसऱ्या दिवशीच्या कामाचा ताणही तात्पुरता दूर झालेला असतो. टीव्हीवरील प्राइम टाइम प्रमाणेच हा सोशल प्राइम टाइम मानला जातो.
मानवी मेंदूवर प्रकाशाचा मोठा परिणाम होतो. रात्रीच्या वेळी कमी झालेला प्रकाश आणि संगीताचे वातावरण मद्यपानासाठी अधिक पोषक वाटते. अंधारामुळे एक प्रकारची गोपनीयता आणि निवांतपणा जाणवतो, जो दिवसाच्या उजेडात शक्य नसतो.
विज्ञानानुसार, आपल्या मेंदूमध्ये एक जैविक घड्याळ असते. संध्याकाळच्या वेळी आपला मेंदू डोपामाइन सारख्या भावनांना लवकर प्रतिसाद देतो. दिवसाच्या प्रखर उजेडात जी शांतता मिळत नाही, ती रात्रीच्या मंद प्रकाशात मेंदूला लवकर जाणवते. त्यामुळे रात्रीच्या वेळी मद्यपान केल्यावर मिळणारी ‘किक’ किंवा नशा ही दिवसाच्या तुलनेत अधिक रिलॅक्सिंग वाटते.