ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 एप्रिल 2026 | बुधवार
1. राज्यातील सात कारखान्यांना राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळानं कर्ज नाकारलं, काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या बसवराज पाटील, संग्राम थोपटे यांचा हिरमोड, धर्मराज काडादी, रावसाहेब दानवे आणि स्वर्गीय अजित पवारांच्या कारखान्यांनासुद्धा कर्जासाठी नकार https://tinyurl.com/2uatynez राज्य सरकारचे चार धडाकेबाज निर्णय, साताऱ्यात आयटी पार्कसाठी जमीन मंजूर, बायोगॅस प्रकल्पांसाठी 500 कोटींचा निधी https://tinyurl.com/3wymr9vp
2. लग्न होत नसल्यामुळे बुलढाण्यात पाच दिवसांत दोन तरुणांची आत्महत्या, गरिबीचं कारण बनलं गंभीर सामाजिक समस्या https://tinyurl.com/yx8htxub
3. संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या वाल्मिक कराड गँगमधील आरोपींची तुरुंगात इतर कैद्यांना मारहाण, जेलमधल्या कथानकाची ऑडिओ क्लिप व्हायरल, तर कुठलीही तक्रार नसल्याची कारागृह अधीक्षकांची माहिती https://tinyurl.com/28349axj सरपंच हत्या प्रकरणातील न्यायालयात सुनावणीच्या प्रत्येक तारखेला आरोपींच्या वकिलांकडून काहीतरी खोडा घालण्याचा प्रयत्न, धनंजय देशमुखांचा आरोप https://tinyurl.com/584efwre
4. विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या वाट्याला सहा, शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला दोन, राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीच्या वाट्याला प्रत्येकी एक जागा येणार, इच्छुकांची फिल्डिंग https://tinyurl.com/3xxmx4xu विधान परिषदेच्या 10 जागांसाठी कुणाकुणाची नावं चर्चेत, संपूर्ण यादी https://tinyurl.com/3evr4wp6
5. महाराष्ट्रात मराठी अनिवार्य झालीच पाहिजे, प्रताप सरनाईकांनी घेतलेला निर्णय योग्य, मुंबईत रिक्षाचालकांसाठी केलेल्या मराठी सक्तीच्या प्रश्नावर अभिनेता रितेश देशमुखचे रोखठोक मत https://tinyurl.com/39pfwb9z अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख एसटीचे ब्रॅण्ड अॅम्बेसिडर, दोघांसोबत एसटी महामंडळाचा पाच वर्षांसाठी करार, प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटीचा निर्णय https://tinyurl.com/2zbnzdy8
6. टिटवाळ्यातल्या ड्रग्ज धाडीसाठी पोलिसांनी लढवली भन्नाट आयडिया, महापालिकेचा सर्व्हे म्हणत केला अश्विनी पॉलच्या घरात प्रवेश, कचऱ्याच्या डब्यात लपवले होते 6 कोटींचे ड्रग्ज https://tinyurl.com/2zz2pesc परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अयान अहमदची पोलिसांनी काढली धिंड, अचलपूर पोलीस ठाण्यात नेत केली चौकशी, इतर आरोपींचीही झाडाझडती https://www.youtube.com/watch?v=_9sEiksFiAk
7. संभाजीनगरमध्ये प्रेमाच्या त्रिकोणाचा जीवघेणा रंग समोर, नवऱ्याशी प्रेमसंबंध असलेल्या महिलेनं केली पत्नीची हत्या, हिंसक प्रेयसीपासून वाचण्याचे पत्नीचे अनेक प्रयत्न फसले आणि मृत्यूने गाठले https://tinyurl.com/896bzkka अकोल्यात अंधश्रद्धेचा कळस, भोंदूबाबाने चिमुकल्याला दाताने उचलत गरागरा फिरवले, उलटं-पालटं करत अघोरी प्रकार https://tinyurl.com/2hyybctk
8. भावाचा मित्र अन् नात्यातला काकाच निघाला नराधम, अल्पवयीन चिमुकलीसोबत भयंकर कृत्य केलं; जळगावच्या चाळीसगावमध्ये समाजमन सुन्न करणारी घटना https://tinyurl.com/2zc4a34a कोल्हापुरात व्याजानं पैसे देण्याच्या बहाण्याने खासगी सावकाराचा महिलेवर अत्याचार, आरोपीच्या मोबाईलमध्ये 200 ते 300 अश्लील व्हिडीओ असल्याचा पीडितेचा सनसनाटी दावा https://tinyurl.com/2tb4d3bp
9. इराणनं चर्चा प्रस्तावाकडं दुर्लक्ष केल्यामुळं ट्रम्प यांच्याकडून नाईलाजानं शस्त्रसंधीला मुदतवाढ, ट्रम्प यांनी मुनीर यांच्यामार्फत पाठवलेल्या संदेशालाही शेवटपर्यंत इराणचा प्रस्ताव नाही https://tinyurl.com/5as2v3dt भारताकडे येणारं जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीत जप्त, इराणच्या लष्कराची कारवाई, जहाज पुन्हा इराणकडे घेऊन गेले https://tinyurl.com/mu24xr9x
10. अभिषेकचं शर्माचे शतक अन् मलिंगाच्या जादूने काव्या मारनच्या हैदराबादचं दिवस बदलले, दिल्लीवरील विजयानंतर पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी झेप https://tinyurl.com/ycp49umx गावात रस्ता नाही, पण आयपीएलध्ये ताशी 150 किमी वेगाने गोलंदाजी, गुजरात टायटन्सचा अशोक शर्मा आहे तरी कोण? https://tinyurl.com/26tdh69x आयपीएलमधील ओपनर ठरले टॉप 10 'रन' मशीन! त्यापैकी 4 लेफ्टीच, आश्चर्यचकित करणारा ट्रेंड https://tinyurl.com/2s3kfp62
एबीपी माझा स्पेशल
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण, पण जखमा अजूनही ताज्या; पहलगाम पुन्हा उभं राहतंय का? https://tinyurl.com/2p9hwt6j
ऑटो डेबिटपूर्वी खातेदारांना माहिती देणं आवश्यक, बँकांच्या मनमानीवर आरबीआयच्या नव्या नियमानं चाप, 24 तासांअगोदर माहिती द्यावी लागणार https://tinyurl.com/yra932xh
एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w