Gold Price Today : एकदम U-turn! सोन्याच्या दरांनी घेतली अचानक झेप, आज 10 ग्रॅम सोनं..
Tv9 Marathi April 25, 2026 01:45 PM

गेल्या काही दिवसांपासून सोन्याते दर खाली घसरत होते, मात्र आज सराफा बाजारात पुन्हा मोठी घडामोड झाली असून तेजीचं वातावरण दिसत आहे. देशात सोन्याच्या दरात पुन्हा तेजी आली आहे. शनिवार, 25 एप्रिलच्या सकाळी, राजधानी दिल्लीत 24-कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,54,200 रुपयांपर्यंत वाढला. मुंबईत हा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 1, 54,050 रुपये इतका आहे. आदल्या दिवशी, दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 200 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 1,55,900 रुपयांवर आला होता. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा भाव प्रति औंस 4,708.17डॉलर आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधीवर करार होण्याची आशा पुन्हा पल्लवित झाली आहे, त्याचा परिणामही सोनं-चांदी या दोन्ही धातूंवर दिसून आला. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची हे पाकिस्तानच्या सर्वोच्च नेतृत्वाशी चर्चा करण्यासाठी शुक्रवारी रात्री उशिरा इस्लामाबादमध्ये दाखल झाले. तसेच, अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर हे शनिवारी पाकिस्तानचा दौरा करणार असल्याचेही वृत्त आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, इराण आणि अमेरिका यांच्यात कोणतीही बैठक नियोजित नाही. इराणची भूमिका पाकिस्तानी अधिकाऱ्यांना कळवली जाईल. अमेरिका आणि इराण यांच्यात 11 आणि 12 एप्रिल रोजी झालेली चर्चेची पहिली फेरी अनिर्णित राहिली.

देशातील महत्वाच्या शहराती सोन्याचे भाव

दिल्लीतील सोन्याचा भाव : दिल्लीत २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,५४,२०० रुपये आहे. २२-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४१,३६० रुपयांवर पोहोचला.

मुंबई आणि कोलकाता : सध्या, मुंबई आणि कोलकातामध्ये २२-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४१,२१० रुपये आहे, तर २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,५४,०५० रुपये आहे.

चेन्नईमधील सोन्याचा भाव : २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ₹१,५३,८१० आहे. २२-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ₹१,४०,९९० आहे.
पुणे आणि बंगळूरुमधील भाव : या दोन शहरांमध्ये २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ₹१,५४,०५० आणि २२-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ₹१,४१,२१० आहे.

शहर 22 कॅरेट सोन्याचे आज भाव (₹) 24 कॅरेट सोन्याचे आज भाव (₹)
दिल्ली 141360 154200
मुंबई 141210 154050
अहमदाबाद 141260 154100
चेन्नई 140990 153810
कोलकाता 141210 154050
हैदराबाद 141210 154050
जयपुर 141360 154200
भोपाल 141260 154100
लखनऊ 141360 154200
चंडीगढ़ 141360 154200

चांदीचे दर किती ?

तर दुसरीकडे सोन्याच्या विपरीत स्थिती चांदीची आहे. चांदी या दुसऱ्या मौल्यवान धातूची किंमत घसरत आहे. 25 एप्रिलच्या सकाळी, किंमत प्रति किलोग्राम 2लाख 59हजार 800 पर्यंत घसरली. एक दिवस आधी, दिल्ली सराफा बाजारात चांदीचे दर 3000 ने घसरून प्रति किलोग्राम 2,47,000 झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सिल्व्हरचा व्यवहार प्रति औंस 75.86 डॉलर दराने होत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.