नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील सिरंजनी मार्गावर आयशर ट्रक आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून आणखी एक जण जखमी झाला आहे. शासकीय धान्य घेऊन जाणारा आयशर ट्रक सिरंजनीच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला त्याने जोरदार धडक दिली. या अपघातात 55 वर्षीय गणेश जाधव यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दुसरा एक व्यक्ती जखमी असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Jalna Live : जालन्यात वंचित बहुजन आघाडीकडून शिवाजी कोण होता पुस्तकाचं सामूहिक वाचनजालन्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे सामूहिक वाचन आयोजित करण्यात आले. जालना महानगरपालिकेतील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर हे सामूहिक वाचन पार पडले. यावेळी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना तडीपार करण्याची मागणी जालना येथील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी केली.
Shirpur Live : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिरपूर विमानतळ येथे आगमनराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिरपूर विमानतळावर दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी राज्याचे राजशिष्टाचार व पणन मंत्री आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल उपस्थित होते. यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार अमरिशभाई पटेल, काशिराम पावरा, राजेश पाडवी, शिरीषकुमार नाईक, अनुप अग्रवाल, राघवेंद्र पाटील, माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार कुणाल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
Chakan Live : चाकणमध्ये सराफा दुकान फोडून चोरी; सीसीटीव्हीत कैद घटनापिंपरी-चिंचवड शहरातील चाकण परिसरात सराफा दुकानात धाडसी चोरीची घटना समोर आली आहे. 23 एप्रिल रोजी पहाटे सुमारे 3.24 वाजण्याच्या सुमारास तीन चोरट्यांनी आयरन कटरच्या साहाय्याने ‘खिमत ज्वेलर्स’ दुकान फोडून चोरी केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान सध्या चाकण पोलिसांसमोर उभे आहे.
Nanded Live : हिमायतनगर रोडवर भीषण अपघात; दुचाकीस्वार ठार, एक जखमीनांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील सिरंजनी मार्गावर आयशर ट्रक आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. शासकीय धान्य घेऊन सिरंजनीकडे जात असलेल्या ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात 55 वर्षीय गणेश जाधव यांचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी एक जण जखमी झाला आहे. जखमीवर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Amravati Live : बडनेरा रेल्वे पुलावर तासभर वाहतूक कोंडी; प्रवाशांचे हालअमरावतीतील बडनेरा रेल्वे पुलावर गेल्या एका तासापासून भीषण वाहतूक कोंडी झाली आहे. या कोंडीमुळे परिसरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, ऐन उन्हाळ्यात प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, घटनास्थळी एकही वाहतूक पोलीस कर्मचारी नसल्याने वाहनचालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील खांडबाऱ्यात माकडाची कापड दुकानात एन्ट्रीनंदुरबार जिल्ह्यातील खांडबाऱ्यात माकडाची कापड दुकानात एन्ट्री...
दुकानात माकडाने खरेदी न करताच घेतली माघारी...
माकडाचा एंट्री ने खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची एकच धावपळ....
माकडाला बघून ग्राहकांची पळापळ.....
माकडाचा उच्छादाची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद...
Latur Live: मुरुडमध्ये रुग्ण घेऊन जाताना शासकीय ॲम्बुलन्समध्ये तांत्रिक बिघाडलातूरच्या मुरुड येथे रुग्णाला घेऊन जाताना शासकीय ॲम्बुलन्स मध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे ॲम्बुलन्स रस्त्यातच बंद पडली. नागरिकांनी ॲम्बुलन्स ढकलून चालू करण्याचा प्रयत्न केला. मात्र ॲम्बुलन्स चालू होऊ शकली नाही. ॲम्बुलन्समध्ये गंभीर परिस्थितीत असणारा रुग्ण हा पुढील उपचारासाठी लातूरला हलवण्यात येत होता. मात्र रस्त्यातच ॲम्बुलन्स बंद पडल्याने खासगी ॲम्बुलन्सने रुग्णाला हाणवण्यात आल्याची माहिती आहे..
Pune Live: पुण्यातील मांजरीमध्ये सोसायटीतून चंदनाच्या झाडांची चोरीमांजरीमध्ये सोसायटीतून चंदनाच्या झाडांची चोरी झाली आहे.
चोरटे सीसीटीव्हीत चंदनाची झाडे घेऊन जाताना कैद
पुणे सोलापूर महामार्गालगत असलेल्या एका सहकारी गृह रचना सोसायटीतून आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास दोन चंदनाच्या झाडांची चोरी झाली आहे.
Marathwada: मराठवाड्यातील हळद मार्केट बंद, व्यापाऱ्यांचा माल बाजार समितीत असल्याने बळीराजा वेटिंगवरमराठवाड्यात सर्वात मोठे हळद खरेदी केंद्र असलेली हिंगोली जिल्ह्यातील संत नामदेव कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करण्याची वेळ बाजार समिती प्रशासनावर आली आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला माल बाजार समितीच्या यार्ड मधून वेळेत उचलला नसल्याने हळद विक्री न करताच शेतकरी बाजार समिती मधून परतले आहेत. दररोज या बाजार समितीमध्ये 2500 क्विंटल हळदीची खरेदी करण्यात येते मात्र खरेदी झालेला माल व्यापारी उचलत नसल्याने पुढील चार दिवस बाजार समिती बंद ठेवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून बाजार समितीमध्ये रिकाम्या जागेत शेड उभारणी करण्यासाठी बाजार समिती प्रशासन लोकप्रतिनिधी मार्फत शासनाकडे निधी मागणी करत आहे मात्र लोकप्रतिनिधींनीच याकडे दुर्लक्ष केल्याने हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. वर्षभर शेतात उत्पादित केलेली हळद बाजारपेठेत विक्री करणे ऐवजी आता घरीच साठवून ठेवावी लागत असल्याने खरिपाच्या पेरणी हंगामाची तयारी कशी करायची असा सवाल शेतकरी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि सरकारला विचारत आहेत. दरम्यान हिंगोलीच्या बाजार समितीतून याचा आढावा घेत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संदीप नागरे यांनी.
Yogi Adityanath: बंगालमध्ये 'जय श्री राम'च्या घोषणांनी ममता दीदी अस्वस्थ होतात - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणतात, "...बंगालमध्ये, 'जय श्री राम'च्या घोषणांनी ममता दीदी अस्वस्थ होतात. हे तेच बंगाल आहे, जिथे ५०० वर्षांपूर्वी चैतन्य महाप्रभूंनी 'हरे कृष्ण, हरे राम'चा शंखनाद केला होता. आणि आज, जर तुम्ही तिथे 'जय श्री राम' म्हटले, तर ममता दीदी हातात काठी घेतात. रामभक्तांवर काठ्यांनी हल्ले केले जातात आणि तिथे उघडपणे गोहत्या केली जाते. वाळू माफिया आणि भूमाफियांचे वर्चस्व वाढले असून, ते बंगालच्या तरुणांकडून रोजगाराच्या संधी हिरावून घेत आहेत. तिथे ना मुली सुरक्षित आहेत, ना व्यापारी; 'लव्ह जिहाद' आणि 'लँड जिहाद'सारख्या घटना घडत आहेत... २०१७ पूर्वी उत्तर प्रदेशमध्ये अशीच परिस्थिती होती. सणासुदीच्या आधीच तिथे गोंधळ सुरू व्हायचा... लोक स्थलांतर करत होते; परंतु २०१७ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये 'डबल इंजिन' असलेले भाजप सरकार सत्तेवर आले आणि आज तिथे कोणताही गोंधळ नसून केवळ उत्सवाचे वातावरण आहे."
Jan Akrosh March: महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून महिलांचा 'जन आक्रोश मोर्चा'महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून भाजप महिला मोर्चाने 'जन आक्रोश मोर्चा' काढला. केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजेही यावेळी उपस्थित आहेत.
राघव चढ्ढा आणि इतर खासदारांनी 'आप' (AAP) सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या संदर्भात, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला म्हणाले, "एकही व्यक्ती स्वतःच्या बळावर निवडणूक जिंकू शकत नाही... ते साधी पंचायत निवडणूकही जिंकू शकत नाहीत... त्यांच्या भाजपमधील प्रवेशामुळे भाजपला कोणताही फायदा होणार नाही..."
Jalna Live: परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, धक्कादायक प्रकारजालना जिल्ह्यातल्या परतुर मध्ये महाराष्ट्र इमारत व इतर कामगार मंडळाच्या लाभार्थ्यांचा संसार उपयोगी साहित्य बेकायदेशीर रित्या घेऊन जाणारा एक ट्रक स्थानिक सनियंत्रण समितीच्या दक्षतेने पकडण्यात आला. या ट्रकमध्ये बांधकाम कामगारांना मोफत दिले जाणार संसार उपयोगी साहित्य मोठ्या प्रमाणात भरून देण्यात येत होतं, याप्रकरणी चार संशयित आरोपींच्या विरोधात परतुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून हे साहित्य नेमकं कोणत्या ठिकाणी घेऊन जाण्यात येत होतं याचा अधिक तपास परतुर पोलिसांकडून करण्यात येत आहे, सध्या हा ट्रक परतुर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आलाय.
Pimpri Chinchvad Live: पिंपरी चिंचवड शहर परिसरात देखील सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनरपिंपरी चिंचवड शहर परिसरात देखील सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर झळकताना दिसत आहेत. या बॅनर्समुळे नागरिकांचे लक्ष वेधले गेले असून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. शहरातील विविध ठिकाणी हे बॅनर लावण्यात आले आहेत., समर्थकांकडून आधीच विजयाचा आनंद साजरा केला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
गुटखा तस्करांशी संबंध तीन पोलिसांचं निलंबनपोलीस कर्मचारी अविनाश ढोणे तसेच त्याचे सहकारी पोलीस शिपाई बबलू पठाण आणि प्रशांत राठोड या तिघांना गुटखा तस्करांशी संगनमत करणे आणि त्यांच्याकडील दोन गुटख्याची पोते चोरल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई.
कल्याण शीळ मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीकल्याण शीळ मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. एक तासापासून वाहतूक कोंडी असल्याने वाहन चालकांना नाहक त्रास होत आहे.
कल्याण डोंबिवलीत मनसेकडून रिक्षांवर मराठी स्टिकर मोहीममराठी भाषा आणि स्थानिक अस्मितेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाल्याचे चित्र कल्याण-डोंबिवलीत दिसत आहे. मी मराठी बोलतो, मला मराठी समजते.माझ्या रिक्षात बसा अशा आशयाचे स्टिकर शहरातील रिक्षांवर लावण्याची मोहीम मनसे पदाधिकाऱ्यांनी सुरू केली आहे.
बुलढाण्यात शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेकबुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता.? या पुस्तकाच्या प्रकाशकाला अश्लील शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर राज्यभरात आ.संजय गायकवाड हे टिकेचे धनी होत आहेत.
मात्र बुलढाणा मतदारसंघातील मोताळा व बुलढाण्यातही आ. गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत आ. संजय गायकवाड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.
आंबा आणि काजू पिकाचे बागायतदारांना हेक्टरी २२ हजारांची भरपाईआंबा आणि काजू पिकाचे बागायतदारांना हेक्टरी २२ हजारांची भरपाई
हवामान बदलामुळे चालू हंगामात आंबा आणि काजू पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने राज्य सरकारने बागायतदारांना हेक्टरी २२ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा कृषी विभागाने बागायतदारांची माहिती संकलनाचे काम युद्धपातळीवर हाती घेतले असून, १५ मे पर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सोलापूर-मुंबई विमान सेवा आठवड्यातून फक्त दोन दिवससोलापूर-मुंबई विमान सेवा आठवड्यातून फक्त दोन दिवस
सोलापूर-मुंबई विमान सेवा आठवड्यातून फक्त दोन दिवस
१ मेपासून ही सेवा फक्त मंगळवार आणि गुरुवार या दोनच दिवशी उपलब्ध राहणार
हा बदल ३१ मेपर्यंत लागू राहणार
Hingoli: हिंगोली बाजार समिती बंद करण्याची प्रशासनावर वेळHingoli: हिंगोली बाजार समिती बंद करण्याची प्रशासनावर वेळ
हिंगोली बाजार समिती बंद करण्याची प्रशासनावर वेळ
मराठवाड्यातील सर्वात मोठे हळद मार्केट पुढील पाच दिवस बंद
बाजार समितीमध्ये जागाच उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना विक्रीला आणलेला परत घरी घेऊन जाण्याच्या सूचना
हिंगोली ची एपीएमसी सोयीसाठी नव्हे तर शेतकऱ्यांच्या मुळावर
Pune: पुण्यात पाणीटंचाई,पाणी नसल्याने पुणेकर हैरानPune: पुण्यात पाणीटंचाई,पाणी नसल्याने पुणेकर हैरान
पुण्यातील उपनगरात पुणेकरांचे हाल..
पाणी नसल्याने पुणेकर झाले हैराण
गेली तीन दिवसापासून पुण्यातील पाणीपुरवठा विस्कळीत असल्याने नागरिकांची गैरसोय...
पुण्यातील मध्यवर्ती भागात तीन दिवसापासून पाणीपुरवठा विस्कळीत महिलांमध्ये नाराजी....
तीन दिवसापासून नळाला पाणी येत नसल्यामुळे महिलांचे हाल...
गोखले नगर, वडारवाडी भागात पाण्याची मोठी टंचाई..
Pune News : वारजे गोळीबार प्रकरणी दोघांना घेतलं ताब्यात, पिस्तुल जप्तवारजे परिसरात गोळीबार करणारे दोघेजण पोलिसांच्या ताब्यात..
गोळीबारासाठी वापरलेली पिस्टल देखील पोलिसांनी केली जप्त..
पूर्ववैमनस्त्यातून गोळीबार केल्या असल्याची पोलिसांची माहिती
गोळीबार करणाऱ्या सहा जणांपैकी प्रीतम ठोंबरे आणि साहिल राऊत दोघांना पोलिसांनी घटनास्थळावरून घेतले ताब्यात...
Mumbai News : BMC अधिकाऱ्याला १० लाखांच्या लाच प्रकरणी अटकमुंबई पालिकेच्या एफ नॉर्थ विभागातील अधिकाऱ्याला एसीबीकडून अटक नवी मुंबईनंतर आता मुंबई महानगर पालिकेतील अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई विशाल भालचंद्र वाणी असे आरोपी अधिकाऱ्याचे नाव एफ नॉर्थ विभागात दुय्यम अभियंता म्हणून कार्यरत बांधकाम साईटसाठी जल निष्कासन परवानगीसाठी १० लाखांची लाच मागणी सापळा रचून एसीबीने कारवाई केली
Nagpur News : अल्पवयीन विद्यार्थीनी मारहाण प्रकरणी शिक्षिकेवर गुन्हा दाखल- अल्पवयीन विद्यार्थिनीला मारहाण केल्या प्रकरणी शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल,
- नागपूरच्या दयानंद आर्या या शाळेतील हा प्रकार.. जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..
- या प्रकरणात शिक्षिकेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असता शिक्षिकेच्या पतीने शाळेत जाऊन दमदाटी करत मुख्याध्यापिकेला धमकी दिली...
- सुमन मसंद आणि तिचा पती राधाकृष्ण मसंद असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव..
Nagpur Weather : विदर्भात उष्णतेची लाट, अकोल्यात सर्वाधिक 45 डिग्री तापमानाची नोंद- विदर्भात उष्णतेची लाट,अकोल्यात सर्वाधिक 45 डिग्री तापमानाची नोंद
- विदर्भातील सर्व जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढलेली असून विदर्भातील सहा जिल्ह्यात 44 अंश किंवा त्याहून अधिक तापमानाची शुक्रवारी नोंद
- राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद अकोल्यात 45 डिग्री एवढी करण्यात आली
- त्या खालोखाल अमरावती 44.8, वर्धा 44.4, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ मध्ये 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली
- पुढील काही दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे.
Scholarship Examination : फलटणमध्ये उद्या शिष्यवृत्ती परीक्षादुधेबावी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याकडून यावर्षीपासून नव्याने सुरू करण्यात आलेल्या प्राथमिक इयत्ता चौथी व उच्च प्राथमिक इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी (ता. २६) आयोजित केली आहे. फलटण शहर व तालुक्यात प्राथमिक स्तर इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण २४ केंद्रामध्ये २४०३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, तर उच्च प्राथमिक स्तर इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण १४ केंद्रांमध्ये १२९० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी चैनय्या मठपती यांनी दिली आहे.
CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज त्र्यंबकेश्वर दौऱ्यावरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर आहेत. गोदा ते नर्मदा जलयात्रा अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ हे देखील जलयात्रेत सहभागी होणार आहेत. 29 मे रोजी ही यात्रा मध्यप्रदेशातील महेश्वरला पोहचल्यानंतर यात्रेचा समारोप होणार आहे.
Pune Weather : पुण्यात आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाजपुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरातील हवामानात मोठे बदल होत असून पुणेकरांना कधी कडाक्याचे ऊन तर कधी पावसाचा अनुभव घ्यावा लागत आहे. शुक्रवारी शहराचा कमाल तापमानाचा पारा 40°C वर पोहोचल्याने उकाड्यात मोठी वाढ झाली होती. मात्र, सायंकाळी हलक्या सरींनी हजेरी लावल्याने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला. दरम्यान, आज शहरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता Indian Meteorological Department यांनी वर्तवली आहे. त्यामुळे पुणे शहराला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरातला सहाव्या गुन्ह्यात अटकनाशिक : महिला लैंगिक शोषण प्रकरणातील सहाव्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या भोंदू अशोक एकनाथ खरात (वय ६७) याला जिल्हा न्यायालयाने रविवारपर्यंत (ता. २६) पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, सुनावणीवेळी बचाव पक्षाने विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कोठडीच्या मागणीला विरोध केला; तर सरकार पक्षाने प्रत्येक गुन्हा स्वतंत्र स्वरूपाचा असल्याने आणखी तपास आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
IT company Case : आयटी कंपनीत महिलांवर अत्याचार; चौघांना सहा दिवसांची पोलिस कोठडीनाशिक : बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत महिलांवर अत्याचार व जबरदस्ती धर्मांतराच्या प्रकरणात संशयित असलेल्या चौघांना न्यायालयाने २९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. शुक्रवारी (ता.२४) त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणातील पाचव्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी एसआयटी पथकाने गुरुवारी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून तौसिफ बिलाल अत्तार, दानिश एजाज शेख, शाहरुख हुसेन शौकत कुरेशी आणि रझा रफीक मेमन यांना ताब्यात घेतले.
Mumbai News : आंबा बागायतदारांचा 15 मे रोजी 'वर्षा' बंगल्यापर्यंत धडक मोर्चामुंबई : दोन महिन्यांपासून मदतीसाठी साकडे घालणाऱ्या कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी राज्य सरकारने हेक्टरी केवळ २२ हजार रुपये टाकून त्यांची थट्टा केली आहे. सरकारच्या या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी आणि हक्काची मदत मिळवण्यासाठी १५ मे रोजी गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या ''वर्षा'' बंगल्यापर्यंत धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
MLA Sanjay Gaikwad : प्रकाशकाला दिलेल्या शिवीगाळबद्दल आमदार गायकवाड यांनी व्यक्त केली दिलगिरीLatest Marathi Live Updates 25 April 2026 : शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून सुरू झालेला वादंग आणि त्यासंबंधी एका व्हायरल फोन कॉलमधून प्रकाशकाला दिल्या गेलेल्या शिव्यांमुळे वातावरण तापलेले असताना पुन्हा एकदा आमदार संजय गायकवाड यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करून महिलांच्या शिवीगाळ प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र, पुस्तकाच्या नावामधील छत्रपती शिवरायांच्या एकेरी उल्लेखाबद्दल आक्षेप कायम असल्याचे सांगितले. याशिवाय देश-राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, वाहतूक कोंडी, राजकीय हालचाली, क्रीडा, मनोरंजन आणि मान्सूनविषयक अपडेट्स यांची सविस्तर माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे.