IPL 2026, DC vs PBKS: पंजाब किंग्सने विक्रमी 265 धावा गाठल्या, दिल्लीच्या गोलंदाजांना धुतलं
GH News April 25, 2026 11:12 PM

आयपीएल 2026 स्पर्धेतील 35व्या सामन्यात चौकार आणि षटकारांचा वर्षाव झाला. या सामन्यात 265 धावांचा यशस्वी पाठलाग करण्यात आला. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं.  दिल्ली कॅपिटल्सने विजयसाठी 265 धावांचं आव्हान दिलं होतं.  त्यामुळे पंजाब किंग्ससाठी हे आव्हान अशक्यप्राय होतं. पण पंजाब किंग्सने इतिहास घडवला आणि विजय मिळवला. पंजाब किंग्सने अर्धा सामना पावरप्लेमध्येच जिंकला होता. तर उर्वरित सामना करूण नायरच्या दोन चुकांमुळे पंजाब किंग्सच्या पारड्यात गेला. श्रेयस अय्यरला दोन जीवदान मिळाले आणि विजय सोपा झाला.  पंजाब किंग्सने 4 गडी गमवून 265 धावांचं आव्हान गाठलं. विशेष म्हणजे 7 चेंडू राखून हा विजय मिळवला.

पंजाब किंग्सचा डाव

दिल्ली कॅपिटल्सने विजयासाठी दिलेल्या 265 धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंग ही जोडी मैदानात उतरली होती. या जोडीने पहिल्या चेंडूपासून प्रहार करण्यास सुरूवात केला. या जोडीने पावरप्लेमध्ये दिल्ली कॅपिटल्सला अर्ध केलं. या जोडीने विकेट न गमावता पावरप्लेच्या 6 षटकात 116 धावा केल्या. आयपीएल स्पर्धेतील पावर प्लेमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या होती. संघाच्या 126 धावा असताना प्रियांश आर्याच्या रुपाने पहिला धक्का बसला. प्रियांश आर्या 43 धावा करून बाद झाला. त्यानंतर प्रभसिमरन सिंग 76 धावा करून तंबूत परतला. कूपर कोनोली 17 धावांवर असताना क्लिन बोल्ड झाला. नेहल वढेरा 15 चेंडूत 25 धावा करून बाद झाला.  खरं तर सामना या विकेटपासून दिल्लीच्या बाजूने झुकण्यास सुरू झाला होता. पण करूण नायरने श्रेयस अय्यरचे दोन सोपे झेल सोडले आणि सामना फिरला.

दिल्ली कॅपिटल्सचा डाव

दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना अवघ्या 28 धावांवर विकेट गमावली. पाथुम निस्संका 11 धावा करून बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी 220 धावांची वाट पाहावी लागली. कारण केएल राहुल आणि नितीश राणा यांनी पंजाब किंग्सच्या गोलंदाजांना झोडलं. नितीश राणाने 44 चेंडूत 91 धावांची खेळी केली आणि बाद जाला. त्याने 11 चौकार आणि 4 षटकार मारले. तर केएल राहुलने 67 चेंडूत 16 चौकार आणि 9 षटकार मारत नाबाद 152 धावा केल्या. तर डेविड मिलरच्या वाटेला फक्त 3 चेंडू आले आणि त्यात त्याने 3 धावा केल्या.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.