1 शेअरवर मिळणार 6 मोफत शेअर्स, कंपनी लाभांशही देणार, रेकाॅर्ड तारखा जाहीर
ET Marathi April 26, 2026 03:45 PM
मुंबई : ऑड्रॉक लिमिटेड (अल्का इंडिया लिमिटेड) ने आपल्या गुंतवणूकदारांसाठी दोन आनंदाच्या बातम्या दिल्या आहेत. कंपनीन बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. तसेच लाभांशही जाहीर केला आहे. यासाठीच्या रेकाॅर्ड तारखाही निश्चित केल्या आहेत.

बोनस शेअर्स
ऑड्रॉक लिमिटेडने ६:१ या प्रमाणात बोनस शेअर्स जाहीर केले आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना त्यांच्याकडील प्रत्येक शेअरमागे सहा मोफत शेअर्स मिळतील. बोनस शेअर्सची एक्स-डेट ८ मे २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे. याचा अर्थ या तारखेनंतर शेअर्स खरेदी करणारे गुंतवणूकदार बोनससाठी पात्र नसतील.

अंतिम लाभांश
कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी प्रति शेअर ०.०४०० रुपयांचा देखील जाहीर केला आहे. या लाभांशाची एक्स डेट २७ एप्रिल २०२६ आहे, म्हणजेच या तारखेनंतर शेअर्स खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांना हा लाभांश मिळणार नाही. २७ एप्रिल, २०२६ ही रेकॉर्ड डेट देखील आहे, ज्याच्या आधारावर कंपनी ठरवेल की कोणत्या भागधारकांना लाभांश मिळेल. आणि बोनस शेअर्सचा लाभ घेण्यासाठी गुंतवणुकीचा निर्णय रेकॉर्ड तारखेच्या आधी घेणे आवश्यक आहे.

शेअर्सचा परतावा
ऑड्रॉक लिमिटेड शेअरची किंमत २०.८७ रुपयांवर आहे. या शेअर्सने १ महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना ४०.४४% परतावा दिला आहे. तर ३ महिन्यात १८९.८६% आणि ५ वर्षात ६,०३८.२४% नफा मिळाला आहे. कंपनीच्या प्रवर्तकांकडे कंपनीचे ९५% शेअर्स आहेत. किरकोळ आणि इतर श्रेणींकडे फक्त ५% शेअर्स आहेत.

तिमाही निकाल
कंपनीने आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या चौथ्या तिमाहीच्या निकालांमध्ये लक्षणीय सुधारणा नोंदवली आहे. कंपनीने ०.८२ कोटींचा निव्वळ नफा आणि २.५० कोटींचा महसूल मिळवला आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत झालेला ०.३८ कोटींचा निव्वळ तोटा भरून काढत कंपनीने ही कामगिरी केली आहे.

.
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.