PRIYANKA CHOPRA KISSING SCENE WITH ANNU KAPOOR: 2011 मध्ये '७ खून माफ' हा सिनेमा प्रियांका चोप्रामुळे प्रचंड चर्चेत आला होता. हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच एका वादानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यावेळी अन्नू कपूर यांनी असा दावा केला होता की, प्रियांकाने त्यांच्यासोबत किस करण्यास नकार दिला होता. त्यांनी असं म्हटलेलं की, 'प्रियांकाला मोठा हिरो किंवा दिसायला देखणा असलेल्या हिरोसोबत किसिंग सीन करायला आवडतो. ते चांगले दिसत नसल्यानं तिने इंटिमेंट सीन करण्यात नकार दिला.' त्यांच्या या वक्तव्यानंतर मोठी चर्चा रंगली होती.
अन्नू कपूर यांनी नुकतीच सिद्धार्थ कन्ननला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी १५ वर्षानंतर प्रियांका चोप्रासोबतच्या वादावर भाष्य केलय. ते म्हणाले, 'लूकपेक्षा जास्त मोठी अडचण ही होती की, मी हिरो नाहीय. मला नक्की माहित नाही काय झालं होतं? परंतु ७ खून माफ सिनेमाबद्दल पत्रकार मला सतत प्रश्न विचारत होते की, प्रियांकाने मला किस करण्यास नकार का दिला? तेव्हा मी म्हटलेलं की, ती तिची मर्जी आहे. परंतु पत्रकार सतत प्रश्न विचारतच असल्याने त्यावेळी मी वैतागून म्हटलेलं की, 'कदाचित मी मोठा स्टार कलाकार नसेल म्हणून तिने नकार दिला असेल'
'आम्हाला सीन करावाच लागला'पुढे बोलताना अन्नू कपूर म्हणाले की, 'या गोष्टीचा कधीच माझ्या कामावर परिणाम झाला नाही. मी त्याकडे दुर्लक्ष केलं. मी प्रियांकाला बेटा म्हणायचो. त्यामुळे ती माझ्यासोबत किसिंग सीन करण्यास साशंक होती. तिच्या वडिलांचे माझे चांगले संबंध होते. तीने स्पष्ट सांगितलेलं की, 'ती या सीनसाठी कन्फटेबल नाही.' तेव्हाही मी तो सीन काढण्याचा सल्ला दिला होता. परंतु ते नाकारण्यात आलं. आम्हाला तो सीन करावाच लागला. तेव्हा तो सीन आम्ही अतिशय व्यावसायिक पद्धतीनं पुर्ण केला.'
माझ्यापेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे पण... अनेक वर्षांपासून सख्ख्या बहिणीसोबत बोलत नाही Neha Pendse; कारण सांगत म्हणाली- 'आमच्यात...'७ खून माफ या सिनेमात अन्नू कपूर यांनी प्रियांका चोप्रो हिच्या सात पतीपैकी एकाची भूमिका साकारली होती. या सिनेमात इरफान खान, नसीरुद्दीन शाह, जॉन अब्राहम, नील नितीन मुकेश यांचीही महत्त्वाची भूमिका होती.
"मुलीला सक्षम बनवण्यासाठी बापाने घेतली परीक्षा" अभिनेत्याने उलगडली अॅक्शन सिनेमागची कथा