86 व्या वर्षात बॉलिवूड अभिनेता आर्थिक अडचणीत? व्हिडीओ व्हायरल होताच अमिताभ बच्चन मदतीसाठी धावले, पत्नी म्हणाली...
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क April 26, 2026 06:43 PM

Bollywood actor Dinesh Hingoo: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिनेश हिंगू (Dinesh Hingoo) यांनी आपल्या कारकि‍र्दीत अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं.  त्यांचा अलिकडेच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हायरल व्हिडीओ पाहून (Bollywood) अनेकांनी दिनेश हे आर्थिक अडचणीत सापडले असल्याचा दावा केला होता. 86 व्या वर्षी त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असल्याचं बोललं जात होतं. त्यांच्या मदतीला अनेक जण सरसावून पुढे आले होते.  बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), राकेश रोशन आणि बोनी कपूर यांसारख्या कलाकारांनी त्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. दरम्यान, दिनेश यांच्या पत्नीने यावर प्रतिक्रिया देत, आमची आर्थिक परिस्थिती स्थिर असल्याचं म्हटलं आहे. 

दिनेश हिंगूंचा व्हिडीओ व्हायरल होताच सिनेकलाकार मदतीसाठी धावले (Dinesh Hingoo Financial Crisis)

दिनेश हिंगू यांचा दोन महिन्यांपूर्वीचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ जुना असल्याचं म्हटलं जात आहे. या व्हिडीओत दिनेश हिंगू दिसत असून त्यांनी, 86 व्या वर्षीही काम करावं लागत आहे, असं सांगितलं होतं. 'डॉक्टरांकडे जाण्यासाठी,  उपचारासाठी पैसे लागतात.  मिळतं काम पण पैसे जास्त हवे आहेत, हवे तेवढे मिळत नाही.  कॅरेक्टर आर्टिस्टला कुणीही जास्त मानधन देत नाही', असं दिनेश हिंगू म्हणाले होते. 

दिनेश हिंगू यांचा व्हिडीओ व्हायरल होताच त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावल्याची चर्चा रंगली होती.  यानंतर पारस पब्लिसिटीचे  राजेश वसाणी यांनी दिनेश हिंगू यांच्या कुटुंबाशी संवाद साधला.  तसेच दिनेश हिंगू यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.  ते म्हणाले, 'अरुण इराणी यांच्या माध्यमातून मी सौ.जमुना दिनेश हिंगू यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांनी यावेळेस आमचं कुटुंब सुखी असल्याचं सांगितलं'.

'दिनेश हिंगू यांच्या कामाची दखल घेतली, यासाठीही सर्वांचे आभार' (Rumours about Dinesh Hingoos financial crisis go viral)

'काहीतरी गैरसमज झाला असावा. यावेळी अनेकांनी काळजी व्यक्त केली, त्याबद्दल आभार.  दिनेश हिंगू यांच्या कामाची दखल घेतली, यासाठीही सर्वांचे आभार, आमची आर्थिक परिस्थिती स्थिर आहे, असं जमुनाबेन हिंगू यांनी सांगितलं', अशी माहिती वसाणी यांनी आपल्या पोस्टमधून दिली.

राजेश वसाणी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं की,  'दिनेश हिंगू यांच्या पत्नी एक गुजराती रंगभूमी कलाकार आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक नाटकांमध्ये काम केलं आहे. दिनेश हिंगू यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे.  त्यांना आर्थिक मदतीची गरज नाही. राकेश रोशन, अमिताभ बच्चन, बोनी कपूर  यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. अमिताभ बच्चन यांच्या ऑफिसमधून फोन आला होता. तसेच आमच्या असोसिएशनसह अनेकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला.  दरम्यान, त्यांच्या पत्नीकडून सत्य परिस्थिती समोर आल्यानंतर मी त्यांचे आभार मानले',  असं राजेश वसाणी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'गदर' सिनेमातील अभिनेत्रीला 'तेरे नाम' चित्रपटासाठी आलेली ऑफर; तेव्हा नाकारली, आता होतोय पश्चाताप

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.