Healthy Chana Dal Stuffed Paratha Recipe for Breakfast: दररोजच्या पोळी-भाजीला कंटाळा आला असेल आणि काहीतरी पौष्टिक पण तितकंच चविष्ट खायचं असेल, तर चणा डाळ पराठा हा एक परफेक्ट पर्याय ठरू शकतो. उत्तर भारतात विशेष लोकप्रिय असलेला हा पराठा आता अनेक घरांमध्ये हेल्दी मील म्हणून बनवला जातो. चणा डाळीतील भरपूर प्रोटीन, मसाल्यांचा सुगंध आणि तुपात भाजलेला खमंग पराठा… ही कॉम्बिनेशनच अशी आहे की एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा खावंसं वाटेल.
अनेकदा स्टफ्ड पराठे करताना सारण बाहेर येणं, पराठा फाटणं किंवा आतून कोरडा होणं अशा समस्या येतात. पण योग्य पद्धतीने बनवल्यास चणा डाळ पराठा अगदी मऊ, फुगलेला आणि भरपूर सारणाने भरलेला तयार होतो. चला तर मग जाणून घेऊया ही सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी.
साहित्य सारणासाठी1 कप चणा डाळ (4-5 तास भिजवलेली)
1 टीस्पून जिरे
चिमूटभर हिंग
1 टीस्पून आले-लसूण पेस्ट
2-3 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
½ टीस्पून हळद
1 टीस्पून लाल तिखट
½ टीस्पून गरम मसाला
चवीनुसार मीठ
बारीक चिरलेली कोथिंबीर
2 कप गव्हाचे पीठ
½ टीस्पून मीठ
1 टीस्पून तेल किंवा तूप
कोमट पाणी
भाजण्यासाठी तूप किंवा तेल
सर्वप्रथम भिजवलेली चणा डाळ कुकरमध्ये घ्या. त्यात हळद, थोडं मीठ आणि आवश्यक तेवढं पाणी घालून 2-3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्या. डाळ पूर्ण मऊ झाली पाहिजे, पण जास्त गळू देऊ नका. शिजल्यानंतर उरलेलं पाणी काढून टाका.
आता कढईत थोडं तेल गरम करून त्यात जिरे आणि हिंग घाला. त्यानंतर आले-लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरच्या परतून घ्या. मग त्यात शिजवलेली चणा डाळ घालून 2-4 मिनिटं परता, जेणेकरून डाळीतील अतिरिक्त ओलावा निघून जाईल. त्यात लाल तिखट, गरम मसाला आणि कोथिंबीर घालून मिश्रण थंड होऊ द्या. नंतर हे मिश्रण जाडसर वाटून घ्या.
Sattu Paratha : उन्हाळ्यात हलकं आणि चविष्ट खायचंय? नाश्त्यासाठी झटपट तयार करा खास सत्तू पराठापराठ्यासाठी पीठ मऊ असणं खूप महत्त्वाचं आहे. गव्हाच्या पिठात मीठ आणि थोडं तेल घालून कोमट पाण्याने मऊसर पीठ मळा. पीठ 15 मिनिटं झाकून ठेवा.
आता पिठाचा मध्यम आकाराचा गोळा घेऊन त्याची छोटी पुरी लाटा. मध्ये 2 चमचे डाळीचं सारण भरून कडा व्यवस्थित बंद करा. हलक्या हाताने कोरडं पीठ लावून पराठा लाटा.
तवा गरम करून पराठा दोन्ही बाजूंनी भाजून घ्या. त्यावर तूप किंवा तेल लावून हलक्या हाताने दाबत भाजा. पराठा सोनेरी आणि खमंग झाला की गरमागरम सर्व्ह करा.