सोमवार : वैशाख शुद्ध ११, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्या, सूर्योदय ६.१० सूर्यास्त ६.५३, चंद्रोदय दुपारी ३.२१ चंद्रास्त पहाटे ३.४८, मोहिनी एकादशी, भारतीय सौर वैशाख ७ शके १९४८.
दिनविशेष२००३ : ‘लक्ष्य’ या वैमानिकरहित विमानाची ओरिसातील चंडीपूर येथे यशस्वी चाचणी.
२०१४ : क्षेपणास्त्रभेदी क्षेपणास्त्राची भारताकडून बालासोर (ओडिशा) येथे यशस्वी चाचणी.
२०१६ : भारताची आघाडीची तिरंदाज दीपिका कुमारी हिने तिरंदाजी विश्वकरंडक स्पर्धेत रिकर्व्ह प्रकारात विश्वविक्रमाशी बरोबरी केली.