धक्कादायक! अंगावर लिफ्ट कोसळून महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू, नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये घडली घटना
Nashik : नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या अंगावर लिफ्ट कोसळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीआहे. या घटनेचा CCTV व्हिडिओ समोर आला आहे. सकाळी मेडिकल कॉलेज मधील घटनेते महिला कर्मचारी गंभीर जखमी झाली होती, महिलेवर मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु होते. ज्योती अहिरे असं या घटनेत गंभीर मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे.
अंतर्गत चौकशी समिती स्थापन करून अहवाल तयार करण्याचे निर्देश
दैनंदिन काम करत असताना इक्विपमेन्ट लिफ्ट महिलेच्या अंगावर पडल्याची घटना घडली होती. घटनास्थळी मुलाने धाव घेत घटनास्थळावरील परिस्थिती बघून मुलाने आक्रोश केला होता. मेडिकल कॉलेज प्रशासनाकडून अंतर्गत चौकशी समिती स्थापन करून अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. आडगाव पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु केला असून,0 संबंधितांवर कायदेशीर कारवाईची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
शहापूरात पुन्हा बिबट्याचा हल्ला; एक महिला जखमी
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील जांभूळवाड येथे आज सकाळी बिबट्याने एका महिलेर हल्ला केल्याची घटना घडली आहे. अरुणा घरत असं हलला झालेल्या महिलेचं नाव आहे. त्या किरकोळ जखमी झाल्या असून त्यांच्यावर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पळसाची पाने तोडण्यासाठी जंगलात गेल्या असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने मागून झडप घातली. मात्र प्रसंगावधान राखत त्यांनी हातातील कोयत्याने प्रतिकार करून स्वतःचा जीव वाचवला. या झटापटीत त्यांच्या मानेवर व गुडघ्यावर जखमा झाल्या असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी वाशाळा वनपरिक्षेत्रातील कळभोंडा येथे बिबट्याच्या हल्ल्यात कृष्णा भागवत अगीवले (वय 8) या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आंबे पाडण्यासाठी गेलेल्या कृष्णावर बिबट्याने हल्ला करून त्याला जंगलात ओढून नेले होते. या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये तीव्र भीती निर्माण झाली आहे.सतत घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करून गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरत आहे.
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका चार महिन्यांच्या बाळाचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप
मुंबईच्या वाडिया हॉस्पिटलमधील शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका चार महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप बाळाच्या आईने केलाय. याप्रकरणी डॉक्टरांवर कारवाईच्या मागणीसाठी बाळाच्या कुटुंबीयांनी 15 एप्रिल ला भोईवाडा पोलिसांना तक्रारी अर्ज केला आहे त्याचप्रमाणे राष्ट्रपतींपासून ते पंतप्रधान, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पोलीस आयुक्त अशा सर्वांकडे पत्रव्यवहार केला असून आपल्या बाळाला न्याय मिळावा, अशी त्यांची मागणी आहे.