Royal Challengers Bengaluru Beat Delhi Capitals Marathi Update :रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये दणदणीत विजयाची नोंद केली. जिथे धावांचा पाऊस पडत असताना RCB च्या गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी करून दिल्ली कॅपिटल्सला ७५ धावांवर गुंडाळले. जोश हेझलवूड व भुवनेश्वर कुमार यांनी मिळून ७ विकेट्स घेऊन DC ला पॉवर प्लेमध्येच बॅकफूटवर फेकले.
RCB ला त्यांच्या नावावरील ४९ ऑल आऊटचा नकोसा विक्रम, आज पुसण्याची संधी होती. पण, DCने अभिषेक पोरेलने ( ३०) तसे होऊ दिले नाही. मात्र, RCB ला विजयापासून दूर राखणे दिल्लीला नाही जमले. बंगळुरूने हा विजय मिळवून IPL 2026 Point Table मधील १२ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावरील पकड मजबूत केली. DC चा हा ८ सामन्यातील चौथा पराभव ठरला.
IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या अडचणीत वाढ! फॉर्मात असलेल्या खेळाडूची स्पर्धेतून माघार, फ्रँचायझीने त्याच्या जागी कुणाला घेतले पाहा...DC च्या फलंदाजांनी आज RCB च्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली. ६ फलंदाज १३ धावांवर माघारी परतल्यानंतर आयपीएल इतिहासातील सर्वात निचांक ( ४९) धावसंख्येचा विक्रम मोडला जाईल असे वाटत होते. पण, RCB ने त्यांच्या नावावरील हा डाग मिटवण्याची संधी गमावली. DC ने १६.३ षटकांत ७५ धावांपर्यंत मजल मारली. जोश हेझलवडू ( ४-१२) आणि भुवनेश्वर कुमार ( ३-५) यांनी पॉवर प्लेमध्ये दिल्लीला ६ धक्के दिले. आयपीएल इतिहासातील पॉवर प्लेमधील सर्वात निचांक ( ६-१३) धावसंख्येचा विक्रम दिल्लीच्या नावावर नोंदवला गेला. यापूर्वी २००९ मध्ये केप टाऊन येथे राजस्थानने १४ धावांत २ फलंदाज ( वि. RCB) गमावले होते.
डेव्हिड मिलर व अभिषेक पोरेल यांनी दिल्लीचा गडगडलेला डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु ही जोडी रसिख सलामने मोडली. मिलर १९ धावांवर बाद झाला आणि पोरेलसोबत त्याची ३५ धावांची भागीदारी तुटली. त्यानंतर कायले जेमिन्सन याने १२ धावांचे योगदान दिले. पोरेल दुसऱ्या बाजूला उभा होताच आणि त्याची विकेट हेझलवूडने घेऊन दिल्लीचा डाव गुंडाळला. पोरेलने ३३ चेंडूंत ३० धावांची खेळी करून संघाला ७५ धावांपर्यंत पोहोचवले.
Who is Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सने १८ वर्षीय नाशिकच्या पोराला दिली पदार्पणाची संधी; ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकलेय वादळी शतक, VideoIPL मधील दिल्लीची ही तिसरी निचांक धावसंख्या ठरली. २०१७ मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध ते दुसऱ्या डावात ६६ धावांवर ऑल आऊट झाले होते. त्यानंतर २०१७ मध्ये पंजाबविरुद्ध पहिल्या डावात ६७ धावांत ऑल आऊट झाले होते.
जेकब बेथेल व विराट कोहली यांनी आक्रमक सुरुवात करताना ३ षटकांत ३३ धावा फलकावर चढवल्या. बेथेल २० धावांवर कायले जेमिन्सनच्या गोलंदाजीवर बाद झाला. फॉर्मात असलेल्या देवदत्त पडिक्कलने आक्रमक फटकेबाजी करून ७ षटकांच्या आत RCB चा विजय निश्चित केला. पडिक्कलने १३ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ३४ धावा केल्या. तर विराट १५ चेंडूंत २३ धावांवर नाबाद राहिला. बंगळुरूे ६.३ षटकांत १ बाद ७७ धावा करून बाजी मारली.