विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...
esakal April 29, 2026 02:45 AM

भाजपाने जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये सुनील विनायक कर्जतकर, माधवी नाईक, संजय नत्थूजी भेंडे, विवेक बिपिनदादा कोल्हे, प्रमोद शांताराम जठार आणि प्रज्ञा सातव यांना संधी देण्यात आली आहे. भाजपकडून ही नावं फायनल करताना जातीय आणि प्रादेशिक समतोलाचा देखील विचार करण्यात आला असल्याची माहिती आहे.

विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या १० जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुले राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच आता भाजपाने त्यांच्या ६ उमेदवारांची यादी जाहीर केली आहेत. यात प्रज्ञा सातव यांच्यासह इतर पाच उमेवदारांचा समावेश आहे. ही यादी जाहीर झाल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.

विधान परिषदेच्या १७ जागांवर लवकरच निवडणूक, तर ९ सदस्यांचा कार्यकाळ संपणार; कुणाला किती जागा मिळणार?

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेतील ९ सदस्यांची मुदत येत्या १३ मे २०२६ रोजी संपणार आहे. यामध्ये संजय केणेकर, नीलम गोन्हे, उद्धव ठाकरे, संदीप जोशी, दादाराव केचे, अमोल मिटकरी, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड आणि शशिकांत शिंदे या ९ सदस्यांचा समावेश आहे. तर विधानपरिषद सदस्य डॉ. प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एका जागेसाठी देखील निवडणूक होणार आहे.

Vidhan Parishad Election : मविआकडून पुन्हा ठाकरेंना संधीची शक्यता, तर शिंदे सेनेत २ जागांसाठी ६ नावं चर्चेत

या १० जागांसाठी १२ मे २०२६ रोजी मतदान होणार आहे. सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान तर सायंकाळी ५ वाजल्यानंतर मतमोजणी करण्यात येणार आहे. या १० पैकी ६ जागा निवडून आणण्याचं संख्याबळ भाजपाकडे आहे. त्यानुसार त्यांनी सहा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.