Mirya Sea Wall : समुद्राच्या अजस्र लाटांना आता बसणार लगाम! मिऱ्या किनाऱ्यावरील 'त्या' रखडलेल्या कामाला अखेर वेग, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
esakal April 29, 2026 02:45 AM

रत्नागिरी : रखडलेले मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम अखेर ग्रामस्थांच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर सुरू करण्यात आले. जयहिंद चौकासमोर बसरा स्टार जहाज अडकल्यामुळे ३०० मीटरचे काम रखडलेले (Mirya coastal erosion barrier work Ratnagiri) होते. जहाज काढल्यानंतरही काम सुरू नव्हते. त्यामुळे स्थानिकांनी पावसापूर्वी बंधाऱ्याचे काम न केल्यास त्या भागातून मानवी वस्तीमध्ये समुद्राचे पाणी शिरण्याची भीती व्यक्त केली होती.

तसेच निवेदन पतन विभागाला दिले होते. त्या बंधाऱ्याचे काम सुरू झाले आहे; परंतु अधिकाऱ्यांनी स्वतः कामाच्या ठिकाणी भेट देऊन त्यावर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Dead Whale Found Are Ware Beach : 20 फूट लांब आणि 10 फूट रुंद! कोकणच्या किनाऱ्यावर महाकाय व्हेल मासा मृतावस्थेत; 4 तासांच्या थरारानंतर विल्हेवाट

दरवर्षी पावसाळ्यात मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर येतो. उधाणाच्या भरतीमुळे वारंवार या बंधाऱ्याची चाळण होते. अजस्र लाटा बंधाऱ्याला गिळंकृत करून मानवी वस्तीमध्ये समुद्राचे पाणी शिरते. यामुळे नागरिक भयभीत होऊन पावसाळ्यात त्यांना रात्र जागून काढावी लागते; परंतु आता सुमारे साडेतीन किमीच्या या धूप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम वेगाने सुरू आहे.

तीन वर्षांमध्ये एकूण तीन हजार १५० मीटरच्या कामापैकी ७० ते ८० टक्के काम झाले आहे. जयहिंद चौक ते पांढरा समुद्र असा ३०० मीटरचा टप्पा राहिला होता. या भागामध्ये गेली तीन वर्षे बसरा स्टार हे मालवाहू जहाज अडकले होते. अनेक अडचणीनंतर ते भंगारात काढण्यात आले. त्यामुळे तो ३०० मीटरचा भागा आता रिकामा झाला; परंतु ते काम रखडले होते.

IMD Yellow Alert Maharashtra : विदर्भाला उष्णतेपासून दिलासा! उद्यापासून पूर्वमोसमी पावसाची शक्यता, अनेक जिल्ह्यांना Yellow Alert, मराठवाडा-पुण्यात काय स्थिती? अधिकाऱ्यांनी पाहणी करावी

पावसाळा तोंडावर असल्याने स्थानिक नागरिकांनी याबाबत पतन विभागाला निवेदन दिले तरी काम सुरू न झाल्याने उपोषणाचा इशारा दिला होता. त्यामुळे रखडलेले हे काम आता पुन्हा सुरू झाले आहे; परंतु हे काम योग्य पद्धतीने आणि समुद्रात व्हावे, अशी स्थानिकांची मागणी आहे. त्यासाठी पतनच्या अधिकाऱ्यांनी काम सुरू असातना त्याची पाहणी करून ठेकेदाराला सूचना कराव्यात, अशी अपेक्षा होती; परंतु अजूनही कोणीही अधिकारी कामाची पाहणी करण्यासाठी आले नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.