जिनिलियानं महाराणी सईबाई साकारण्यास नकार दिलेला...; रितेश देशमुखनं सांगितला कुणालाच ठाऊक नसलेला 'तो' किस्सा
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क April 29, 2026 10:13 AM

Riteish Deshmukh Raja Shivaji Movie: रितेश देशमुख (Riteish Deshmukh) दिग्दर्शित, अभिनित सिनेमा 'राजा शिवाजी' (Raja Shivaji Movie) सिनेमा 1 मे रोजी म्हणजेच, महाराष्ट्र दिनी रिलीज केला जाणार आहे. सध्या संपूर्ण देशभरात या सिनेमाची क्रेझ पाहायला मिळतेय. या सिनेमात स्वतः रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) भूमिका साकारताना दिसणार आहे. तर, या सिनेमात जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) हिनं महाराणी सईबाईंची (Maharani Saibai) भूमिका साकारली आहे. तर, एकापेक्षा एक दिग्गज बॉलिवूड सेलिब्रिटी (Bollywood Celebrity) आणि मराठी कलाकारांची (Marathi Actors) मांदियाळी या सिनेमात झळकणार आहे. अशातच सध्या या सिनेमाची क्रेझ जोरात असून सध्या सिनेमाबाबत अनेक नवनवीन गोष्टी समोर येत आहेत.  सिनेमाच्या प्रमोशनसाठी दिग्दर्शक रितेश देशमुख अनेक मुलाखती देत आहे. अशाच एका मुलाखतीत बोलताना रितेश देशमुखनं जिनिलियानं सुरुवातीला महाराणी सईबाईंची भूमिका साकारण्यासाठी संकोच व्यक्त केल्याचं सांगितलंय.  

रितेश विलासराव देशमुख (Riteish Vilasrao Deshmukh) यानं सांगितलं की, महाराणी सईबाईंच्या भूमिकेबाबत सुरुवातीला जिनिलियानं संकोच व्यक्त केलेला आणि ती भूमिका स्वीकारण्यास नकार दिला होता. पण नंतर तिनं ही भूमिका साकारल्यानंतर तिचा प्रभावी अभिनय पाहून मी शूटिंगदरम्यान भावूक झालो आणि डोळ्यांतून अश्रू वाहू लागले, असा खुलासा रितेश देशमुख यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला. 

Raja Shivaji: Who Was Saibai Bhonsle? The Real Story Behind Genelia  Deshmukh's Role | Herzindagi

जिनिलियाला ऑफर केलेल्या महाराणी सईबाईंच्या भूमिकेबाबत रितेश देशमुख काय म्हणाला? (Riteish Deshmukh On Genelia)

अभिनेता रितेश देशमुख यानं जिनिलियाला ऑफर करण्यात आलेल्या महाराणी सईबाईंच्या भूमिकेबाबत सांगितलं की, "जेव्हा मी जिनिलियाला सईबाईंची भूमिका नरेट केली, तेव्हा ती थेट 'नाही' म्हणाली होती... सईबाईंचं व्यक्तिमत्त्व खूप मोठं आहे, मी हे करू शकणार नाही, असं जिनिलियानं म्हटलेलं. मात्र, आता ती भूमिका साकारल्यानंतर जिनिलिया म्हणतेय की, "अशा महान व्यक्तिमत्त्वाला पडद्यावर जिवंत करण्याची संधी मिळणं हे तिच्यासाठी खूप मोठं सौभाग्य आहे..."

पुढे बोलताना रितेश देशमुख म्हणाला की, "महाराज आणि महाराणी सईबाई यांचा एक अतिशय भावूक करणारा सीन आहे. खरं तर त्या सीनमध्ये मला रडायचं नव्हतं, फक्त डोळ्यात पाणी असणं अपेक्षित होतं... पण ज्या ताकदीनं जिनिलियानं तो सीन केलाय, ते पाहून मी ढसाढसा रडायला लागलो. फक्त मीच नाहीतर तर सेटवर असलेल्या कॅमेरामॅनपासून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं... ती जागा आणि तो दिवस मी कधीच विसरू शकणार नाही... कधी कधी एखाद्या प्रसंगात अशी एक शुद्धता असते..."

"महाराज एक उत्तम पती, मुलगा, भाऊ आणि रयतेचे राजा होते. पण सईबाईंसोबतच्या त्यांच्या नात्यात एक वेगळीच पवित्रता होती. त्यांच्या नात्याकडे पाहताना भगवान राम आणि माता सीता यांच्या नात्याची आठवण येते, निर्मळ, नितळ आणि अत्यंत शुद्ध. जे आम्ही पडद्यावर तितक्याच आदराने साकारण्याचा प्रयत्न केला आहे. त्या दिवशी सेटवर जणू सगळेच त्या भावनेत वाहून गेले होते...", असं रितेश देशमुख म्हणाला. 

Riteish Deshmukh Raja Shivaji: '...हा दिग्दर्शन करणार? बघू काय दिवे लावतो...', रितेश देशमुख यानं सांगितलं दिग्दर्शक होण्याच्या निर्णयामागचं 'ते' मोठं कारण

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.