मुंबई : विद्यापीठाचे संकुल हा आखाडा नाही. स्वतःहून विद्यापीठ संकुलातून बाहेर पडणार की आम्ही आदेश देऊ, अशा कडक इशारा उच्च न्यायालयाने मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात अनेक महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या माजी विद्यार्थी राजेश बळखंडे ऊर्फ भदंत विमांसा यांना बुधवारी (ता. २९) दिला.
राजेश हे अद्याप संकुलात आंदाेलन करत असल्याची माहिती विद्यापीठाने न्यायालयालादिली. त्यावर याचिकाकर्ता पीएचडीचा विद्यार्थी असून पाली भाषा विभाग सुरू करण्याच्या मागणीसाठी तो शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत असल्याचा दावा वरिष्ठ वकील मिहीर देसाई यांनी केला. त्यावर हे विद्यापीठाचे संकुल असून आखाडा नाही. तुम्ही विद्यार्थी आहात, विद्यार्थ्यासारखे वागा. आंदोलन करायचे तर संकुलाबाहेर करा, असे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठाने राजेश यांना सुनावले. अशा आंदोलनामागील खरे चहरे नेहमीच पडद्याआड असतात, अशी टिप्पणीही केली.
Mumbai: महापौर बंगल्याच्या नूतनीकरणाला मंजुरी, तब्बल ३ कोटींचा खर्च; पण रखडलेली देखभाल आणि 'गृहप्रवेशा'बाबत प्रश्नचिन्हराजेश यांना पीच.डी. मुदतीत पूर्ण न करता आल्यामुळे त्यांच्यासह ८ नोव्हेंबर २०२५ ला ५४३ विद्यार्थ्यांचे प्रवेशही रद्द केले गेले. राजेश यांना वसतिगृहातील खोली रिक्त करण्याच्या नोटिसा अनेकदा पाठवूनही त्यांनी खोली रिक्त केली नाही. निवृत्त जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समितीसमोर त्यांनी एकदाही उपस्थिती लावली नाही. उलट त्यांनी आंदाेलन सुरू केले. पोलिसांनीही राजेश यांच्यावर कारवाई करण्याचे टाळल्यामुळे उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे विद्यापीठाने याचिकेत म्हटले होते.
...तर इतर भाषिकही आंदाेलने करतील!आंदोलनाला आमचाही विरोध नाही; परंतु उद्या अन्य भाषिक विद्यार्थीही अशा प्रकारच्या मागण्यांसाठी आंदोलन करतील. याचिकाकर्त्याला पाली भाषेतून पीएचडी करायची असल्यास त्यांनी छत्रपत संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात जावे. याचिकाकर्त्यांनी आझाद मैदानात आंदोलन करावे. संकुल कधी सोडणार हे गुरुवारी (ता.३०) स्पष्ट करावे; अन्यथा आम्ही तसे आदेश देऊ, असा इशारा न्यायालयाने राजेश यांना दिला.
Mumbai Pune Expressway: यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ पूर्ण; घाटातील कोंडीपासून सुटका