Ryan Rickeltonने इतिहास रचला! जयसूर्या, तेंडुलकर यांचा विक्रम मोडला; जगात असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला...
esakal April 30, 2026 02:45 AM

Ryan Rickelton first player to score centuries for multiple MI teams : रायन रिकल्टन याने मुंबईचे वानखेडे स्टेडियम दणाणून सोडले. क्विंटन डी कॉकच्या दुखापतीमुळे पुन्हा मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेल्या रिकल्टनने नाबाद १२३ धावांची विक्रमी खेळी केली. सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांचा समाचार घेताना त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली.

MI ज्या सुरुवातीच्या शोधात होता, ती आज मिळाली...SRHविरुद्ध विल जॅक्स व रायन रिकल्टन ही नवी जोडी सलामीला आली आणि दोघांनी ७.१ षटकांत ९३ धावांची भागीदारी केली. जॅक्स २२ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ४६ धावांवर झेलबाद झाला. सूर्यकुमार यादव ( ५) पुन्हा अपयशी ठरला, तर नमन धीर ( २२) व हार्दिक पांड्या ( ३१) यांनी रिकल्टनच्या सोबतीला उभं राहून अनुक्रमे ५५ व ५६ धावांची भागीदारी केली. रिकल्टन ५५ चेंडूंत १० चौकार व ८ षटकारांसह १२३ धावांवर नाबाद राहिला.

Riyan Parag Vaping: परागच्या 'दम मारो दम'ने BCCI चा निघाला धूर... वादावर दिली पहिली प्रतिक्रिया... RR कॅप्टनचं काही खरं नाही

मुंबई इंडियन्ससाठी डावात सलामीवीरांमध्ये सर्वाधिक धावांचा अंतराच्या विक्रमात रिकल्टन व जॅक्स ( ७७ धावा) तिसऱ्या क्रमांकावर आले. त्यांनी रोहित शर्मा ( नाबाद १०५) व तिलक वर्मा ( ३१) वि. चेन्नई सुपर किंग्स, २०२४ यांचा ७४ धावांच्या अंतराचा विक्रम मोडला. या विक्रमात सनथ जयसूर्या ( नाबाद ११४) व रॉबिन उथप्पा ( नाबाद १६) वि. चेन्नई, २००८ ही जोडी ९८ धावांसह अव्वल आहे. लेंडन सिमन्स ( नाबाद १००) व रोहित शर्मा ( १८) यांच्या २०१४ मध्ये मोहालीत पंजाब किंग्सविरुद्धच्या ८२ धावांचे अंतर होते.

मुंबईने ५ बाद २४३ धावा उभ्या केल्या, ज्या वानखेडेवरील सर्वोत्तम सांघिक धावा ठरल्या. याच पर्वात RCB ने इथे ४ बाद २४० धावा केल्या होत्या. एकूण मुंबई इंडियन्सची ही तिसरी सर्वोत्तम धावसंख्या ठरली. रायन रिकल्टन हा मुंबईकडून सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या करणारा फलंदाज ठरला. त्याने सनथ जयसूर्याचा ( नाबाद ११४ वि चेन्नई, २००८) विक्रम मोडला. रोहित शर्मा ( नाबाद १०९) व सचिन तेंडुलकर ( १००) यांचाही विक्रम मोडला गेला. तसेच मुंबईकडून शतक झळकावणारा तो क्विंटन डी कॉक याच्यानंतर दुसरा यष्टिरक्षक ठरला.

मुंबई इंडियन्ससाठी Vaibhav Sooryavanshi, तुमची साथ सोडू शकतो; राजस्थान रॉयल्स, 'पोस्टर बॉय'वर लक्ष ठेवा, ३० कोटी...

मुंबई इंडियन्स फ्रँचायझीच्या दोन वेगवेगळ्या संघाकडून शतक झळकावणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला. त्याने दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीगमध्ये MI Cape Town संघाकडून खेळताना २०२५ मध्ये ११३ व २०२६ मध्ये नाबाद ११३ धावांची खेळी केली होती. आज त्याने मुंबई इंडियन्सकडून नाबाद १२३ धावा केल्या.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.