देशातील जनतेची चिंता वाढवणारी बातमी आहे. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये मोठी झाली आहे. त्यानंतर आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची भीतीही लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झालेली आहे. मात्र इंधनाच्या किमती स्थिर राहिल्याने तेल कंपन्यांचे नुकसान वाढत आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या जाऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे सर्वसामान्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
कच्चा तेलाच्या किमतीत मोठी वाढन्यूज एजन्सी पीटीआयने दिलेल्या एका वृत्तानुसार, सरकारी सूत्रांनी आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता नाकारलेली नाही. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढून प्रति बॅरल 126 डॉलर या चार वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचल्या होत्या. मात्र आता त्यात घट झाली असली तरी किमती अजूनही 110 डॉलर प्रति बॅरलच्या वरच आहेत. तसेच होर्मुज सामुद्रधुनीतून तेलवाहू जहाजांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे, त्यामुळे आता आगामी काळात इंधनाच्या किमती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तेल कंपन्या तोट्यातफेब्रुवारी महिन्याच्या शेवटी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय तेल बाजारात मोठी उलथापालथ झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या जहाज वाहतूक बंद झाली होती. त्यामुळे तेलाच्या किमती वाढल्या आहेत. गेल्या आठवड्यात पेट्रोलियम मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले होते की, जवळपास चार वर्षे किरकोळ किमती स्थिर असल्यामुळे सरकारी तेल कंपन्यांना पेट्रोलवर आणि डिझेलवर मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे आगामी काळात इंधनाच्या दरात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
इंडियन ऑइलने दरवाढीची शंका नाकारलीइंधन दरवाढीची चर्चा सुरू असताना इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) ने एक निवेदन जारी करत म्हटले होते की आंतरराष्ट्रीय ऊर्जा किमती वाढल्या असल्या तरी पेट्रोल, डिझेल आणि घरगुती एलपीजीच्या किमती वाढवण्यात आलेल्या नाहीत. दरम्यान विश्लेषकांनी यापूर्वी असा अंदाज व्यक्त केला होता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रति लिटर 25 ते 28 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. मात्र सरकारने अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही.