पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात चार वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार (Bhor Crime News) करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आणि त्यानंतर आज गावात कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे आणि सोबतच या नराधमाला फाशीची शिक्षा द्या (Bhor Crime News)अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे, नाहीतर आरोपीला आमच्या हाती द्या, आम्ही त्यांचं काय करायचं ते बघून असं म्हणत ग्रामस्थांनी घटनेवर संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणामुळे गावातील वातावरण तापलं असून पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाल्याचा पाहायला मिळाले. आमदार शंकर मांडेकर (Shankar Mandekar) देखील या ठिकाणी दाखल झाले आहेत, तर या घटननेबाबत पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी माहिती दिली. (Pune Crime news)
- शुक्रवार दुपारी 3. वाजता पीडित चिमुकली शेवटची राम मंदिर परिसरात दिसली.
- दु. 3:45वा. पाऊनतास होऊनही मुलगी घरी न आल्याने आज्जीकडून मुलीचा शोध सुरू झाला
- दु. 4 वा. नसरापूर ग्रामस्थांकडून मुलीची शोधाशोध सुरू केली.
- दुपारी 4.30 वा...गावातील सीसीटीव्ही शोधले तेव्हा आरोपी मुलीला घेऊन गोठ्याकडे जाताना दिसला.
- संध्या. 5.30 वा. ग्रामस्थांनी आरोपीला बनेश्वर फाट्यावरून पकडून आणला, चोप मिळताच आरोपी ने मुलीचा मृतदेह लपून ठेवलेली जागा गावकऱ्यांना सांगितली...आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले.
- संध्या 6:00 वा शेणाच्या ढिगाऱ्यातून अत्याचारीत चिमुकलीचा मृतदेह बाहेर काढताच गावकऱ्यांचा उद्रेक झाला.
- संध्या. 7 वा. संतप्त ग्रामस्थांचा पोलिसांना जागेवरच घेराव...वादावादीनंतर पोलिसांनी डेडबॉडी हलवली.
- राञी 8 वा. ग्रामस्थांचा राजगड पोलीस स्टेशनला घेराव घातला.
- राञी 9 वा...गावकऱ्यांनी बँगळुरू हायवेवर रास्ता रोको केला.
- राञी 11 वा. एसपी गिल आंदोलन स्थळी दाखल...लेखी आश्वासनानंतर रास्तारोको मागे पण शनिवारी गावबंदीची घोषणा केली.
- शनिवार सकाळी 7 पासून नसरापुरात कडकडीत बंद पाळला
- शनिवार सकाळी 9 वा...फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल, पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले.
- सकाळी 10 वा...नसरापूर च्या भैरवनाथ मंदिरापासून मोर्चा सुरू झाला.
- सकाळी 11 वा. सुपर बाजार परिसरात मोर्चा आंदोलन सभेत रूपांतरित झालं.
- दुपारी 11:30 पर्यंत...गाव पुढारीकडून आंदोलकांची समजून काढली पण तरीही गावकरी ऐकून घेईनात.
- दु. 11:45 वा...भोरचे आमदार शंकर मांडेकर आंदोलन स्थळी आले, कठोर कारवाईचं आश्वासन दिलं तरीही मोर्चेकरी ऐकून घेईना...थेट मुख्यमंत्र्यांना फोन करण्याची मागणी लावून धरली.
- 12.15 वा...माजी आमदार संग्राम थोपटे आंदोलन स्थळी दाखल, मोर्चेकऱ्यांना संबोधित करून केस फास्ट ट्रँकवर नेण्याचं आश्वासन...तरीही मोर्चेकरी ऐकून घेईना.
- 12.20 ते 12: 30 वा...मांडेकरांनी मुख्यमंत्र्यांना दोनदा फोन लावण्याचा प्रयत्न केला पण फोन लागला नाही.
- दु. 12:34 वा ...मंञी आदिती तटकरेंना फोन लागला...आणि आमदारांनी पुन्हा आश्वासन देऊन हायवे न रोकण्याचं आवाहन केले.
- दु. 12:40 वा ...अखेर दोन्ही आमदारांच्या विनंती नंतर मोर्चा स्थगित...पण ग्रामस्थांचा संताप कायम आहे.
संदीपसिंग गिल म्हणाले, काल (शुक्रवारी, ता १) नसरापूर येथे दुदैवी घटना घडली. साडे तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या केली. आम्ही एक दीड तासाच्या आत आरोपीला अटक केली, त्या मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आलेली होती. यात पॉक्सो सह इतर कलम लावण्यात आले आहेत. राजगड पोलिस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला तपास केला जातोय. या घटनामध्ये लोक भावनिक आहे, काही वेळ लोक रस्त्यावर आले होते,आम्ही तपास करत आहोत. आरोपीबाबत माहिती नसताना तांत्रिक तपास करून अटक केली आहे, लोकांनी सहकार्य केलं आहे, तातडीने दोषारोपपत्र दाखल करून ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चलवावी म्हणून आम्ही आग्रही आहे. आरोपीवर १९९८, २०१५ साली गुन्हा दाखल होते, त्यातून मुक्त झाला आहे, दोन्ही विनयभंग गुन्हे दाखल आहे, वयस्कर आहे, त्याची प्रवृत्ती तशीच आहे. गावात असाच फिरत असतो, आजूबाजूला गावात छोटे मोठे काम करत असतो. मुलगी आजीकडे आली होती, गावात जास्त लोक नसतात, खेळत असताना तिला कशाची फूस लावली याचा तपास करत आहोत, अशी माहिती देखील संदीपसिंग गिल यांनी दिली आहे.
पोलीस आणि नसरापुरातील ग्रामस्थांची बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली आहे, ग्रामस्थांनी या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढला होता, गावातील सुपर मार्केटच्या चौकामध्ये ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन पुकारला आहे. पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू आहे. याच दरम्यान पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये बाचाबाची झाली. पोलीस ग्रामस्थांची समजूत काढत आहेत की आम्ही आरोपीला ताब्यात घेतलं आहे सर्व तपास सुरू आहे, त्यानंतर हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात दाखल करू, पोलीस त्यांना शब्द देत आहेत मात्र तुम्हाला आरोपी मिळाला आहे तो आमच्या ताब्यात द्या, नाहीतर त्याला फाशीची शिक्षा करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी ग्रामस्थांशी बोलताना हुल्लडबाजी करू नका आम्हाला, आमचा तपास करू द्या, असा शब्द वापरला. त्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले, त्यानंतर थेट तुम्ही तुमचं काम करा. आम्हाला पुन्हा एकदा सगळं बंद करायला भाग पाडू नका, असं ग्रामस्थांनी पोलिसांना म्हटलं. घटनास्थळी स्थानिक आमदार शंकर मांडेकर दाखल झालेले आहेत. मांडेकर देखील ग्रामस्थांशी चर्चा करत आहेत, ज्याप्रकारे मुलीला निर्दयीपणे संपवण्यात आलं, तसंच पुन्हा काही घडू नये यासाठी सर्व ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत, भर उन्हात सर्व ग्रामस्थ गावातील चौकात येऊन थांबलेले आहेत, या घटनेतील जो नराधम आहे, त्याला आमच्या ताब्यात द्या, ज्या गोठ्यात त्याने त्या चिमुकलीसोबत ते कृत्य केलं, त्याच गोठ्यात त्याला फाशीची शिक्षा द्या, नाहीतर आमच्या हवाली करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.