Bhor Child Kill Case : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात घडलेल्या एका अत्यंत संतापजनक आणि हृदयद्रावक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर ६५ वर्षीय आरोपीने अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी तीव्र संताप व्यक्त करत ही घटना अत्यंत निंदनीय आणि क्लेशदायक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या.
पोलिसांनीआरोपीला तत्काळ अटक केली असून त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचे काही जुने संदर्भही तपासात उघड होत आहेत. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Software Engineer Privacy : भाड्याच्या घरात आंघोळ करणाऱ्या 23 वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता तरुणीचा गुप्तपणे काढला व्हिडिओ; 30 वर्षीय MBA पदवीधराचं घृणास्पद कृत्यमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, हे प्रकरण फास्टट्रॅक न्यायालयात चालवण्यासाठी राज्य सरकार न्यायालयाकडे विशेष विनंती करणार आहे. आरोपीला शक्य तितक्या लवकर कठोरात कठोर, म्हणजेच मृत्यूदंडाची शिक्षा मिळावी, अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Mumbai Family Death Mystery : कलिंगडात विष नव्हतं, मग मृत्यू कसा झाला? मुंबईतील डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, FDA चा धक्कादायक अहवाल समोरदरम्यान, या घटनेनंतर विरोधकांकडून राज्यातील महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, प्रत्येक घटनेत राजकारण करण्यापेक्षा संवेदनशीलता दाखवणे अधिक महत्त्वाचे आहे. राज्य सरकार आवश्यक त्या सर्व ठोस उपाययोजना करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या अमानुष घटनेच्या निषेधार्थ नसरापूर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. गावकऱ्यांनी ‘मुका मोर्चा’ काढून संताप व्यक्त केला. प्रशासनाकडून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले असले, तरी परिसरात अद्याप तणावपूर्ण शांतता आहे.