मंगळवेढा - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परिक्षेचा तालुक्याच्या निकाल सलग दुसऱ्या वर्षी घटून तो 80.10 टक्के लागला असून शिक्षण मंडळांनी कॉपीमुक्त अभियान राबवल्यामुळे यंदाच्या निकाल गतवर्षीप्रमाणे 5.44 टक्क्यांनी घटला.
2024 साली तालुक्याचा निकाल 97% होता गतवर्षी हा निकाल 85% वर आला.यंदाच्या निकालातही घट होत ८० टक्क्यावर आला. शिक्षण मंडळाने राबवलेल्या कॉफी मुक्त अभियान व कडक परीक्षेमुळे हा निकाल घटना त्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा निकाल महत्त्वाचा ठरला.तालुक्यातून 2960 विदयार्थ्यानी या परिक्षेसाठी नोंदणी केली. प्रत्यक्ष परीक्षेला 2900 विद्यार्थी बसले 2323 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.54 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले.
352 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर द्वितीय श्रेणी मध्ये 1324 तर तृतीय श्रेणीमध्ये 593 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्यातील केंद्रावर परीक्षा मंडळाने सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यामुळे कॉफीवर मोठ्या प्रमाणात अटकाव झाला त्याचा परिणाम निकालावर दिसून आला. विशेषता प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा घटली.निकालामध्ये मुलींनीच बाजी मारली.तालुक्यातील शारदा सिद्धनाथ विद्यालय व जुनिअर कॉलेज पाटखळ या एकमेव शाळेचा निकाल शंभर टक्के लागला. तर डोणजच्या महासिद्ध विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजचा सर्वात कमी निकाल लागला.
शास्त्र व कला शाखेत तालुक्यातील प्रथम येण्याचा मान शाहू शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी मिळवला कला शाखेत पाठखळच्या शारदा सिध्दनाथ ज्यु.काॅलेज विनायक बाळू काटकर याने 81.50 टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम आला., शास्त्र शाखेत माध्यमिक आश्रमशाळा व ज्यु.कालेजची गाथा दत्तात्रय हजारे हिने 90.17 टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम आला. तर वाणिज्य शाखेत श्रावणी घुले 83.50% टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम आली. तर व्यवसाय व तंत्रशिक्षणमध्ये इंग्लीश स्कूल जुनियर कॉलेजची भाग्यश्री चौगुले यांनी 85 टक्के गुण मिळवत पहिली आली.
शाळा निहाय पुढीलप्रमाणे - इंग्लीश स्कूल ज्यु. कॉलेज (80.64), श्री संत दामाजी महाविदयालय मंगळवेढा (78.31), विदयामंदीर हायस्कूल व ज्यु. कॉलेज सलगर बु. (64.37), पोस्ट बेसीक आश्रमशाळा बालाजीनगर (56.25), कै. दत्ताजीराव भाकरे प्रशाला व कनिष्ठ महाविदयालय आंधळगाव, (73.52), शरद नगर ज्यु कॉलेज, मल्लेवाडी (72.22), इंग्लीश स्कूल भोसे (88.23), माध्यमिक आश्रमशाळा व ज्यु. कॉलेज येड्राव खवे (95.30),एम पी मानसिंगका विदयालय व ज्यु कॉलेज,सोड्डी (55.64), स्वामी विवेकानंद विदयालय व ज्यु कॉलेज,गोणेवाडी (99.13), विठठलराव नारायण येलपले ज्यु. कॉलेज येड्राव खवे (97.01), महासिध्द विदयामंदीर व ज्यु कॉलेज डोणज (40.74), हनुमान विदयामंदीर व कला व शास्त्र महाविदयालय मरवडे (74.50), कर्मयोगी ह. रा. कवचाळे ज्यु. कॉलेज बोराळे (70.58), बाळकृष्ण विद्यालय व ज्यु.कॉलेज नंदेश्वर (94.02), माध्यमिक व ज्यु. कॉलेज अरळी (63.71), इंग्लीश स्कूल ज्यु कॉलेज मंगळवेढा (50),पार्वती ताड आयटीआय (45.45), आयटीआय गुंजेगाव (77.77),प्रथमेश इंटरनॅशनल ज्यु. कॉलेज (85.71),माध्यमिक आश्रम प्रशाला व ज्युनिअर कॉलेज बालाजी नगर (63.71), आर.बी.सी जुनियर कॉलेज सिद्धापूर (65.62) सुतार इंटरनॅशनल कॉलेज (९०.०७)