नसरापूर येथे घडलेल्या अमानुष घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करत ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील नवले पुलावर आंदोलन करण्यात आले. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. सुमारे तीन तासांनंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.
महत्त्वाचे म्हणजे ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. यावेळी पीडित मुलीच्या वडिलांची कॉलर पकडून त्यांना बाजूला करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आंदोलक चांगलेच आक्रमक झाले आहेत. आम्ही इथे न्यायासाठी आलो आहोत मात्र, पोलीस आमच्यावर बळाचा वापरत करत आहेत, असं एका आंदोलकाने सांगितलं.
पुण्यातील नवले पूलावर रास्तारोको; मोठी वाहतूक कोंडी, दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगापुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे ६५ वर्षीय व्यक्तीने चार वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संताप उसळला असून, न्यायाच्या मागणीसाठी त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे.
Mumbai Goa Highway Traffic : मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमानी-पर्यटकांचा खोळंबा! इंदापूर-माणगाव पट्ट्यात वाहनांच्या लांब रांगा; सलग सुट्ट्यांमुळे भीषण स्थितीपीडित मुलगी सुट्टीसाठी आजोळी, नसरापूर येथे आली होती. आरोपीने तिला “वासरू दाखवतो” असे सांगून गोठ्याकडे नेले. तेथे तिच्यावर अत्याचार करून हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेह गोठ्यातील शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवण्यात आला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी मुलीला गोठ्याकडे नेताना दिसल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला, या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट आहे.