ईस्लापूर : नांदेड जिल्हा पोलीस दलामार्फत राबविण्यात येत असलेल्या “ऑपरेशन क्रॅकडाउन” अंतर्गत किनवट तालुक्यातील इस्लापूर पोलीस ठाणे हद्दीतील मौजे शिवनी व परिसरात रविवारी (दि. 3 मे 2026) पहाटे मोठी संयुक्त कारवाई करण्यात आली. ग्रामीण भागात अवैध दारू निर्मिती, विक्री व त्यातून वाढणाऱ्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे.
सदर परिसरात हातभट्टी दारू निर्मितीची प्रवृत्ती पूर्वीपासून आढळत असल्याने पोलिसांनी सखोल माहिती संकलित करून अत्यंत गोपनीय आणि नियोजनबद्ध पद्धतीने पहाटे 4 वाजल्यापासून कारवाई सुरू केली.
या कारवाईत इस्लापूर पोलीस ठाण्यासह 1 अतिरिक्त पोलीस अधीक्षक, 10 अधिकारी, 105 पोलीस अंमलदार तसेच 2 RCP प्लाटूनचा सहभाग होता.
कारवाईदरम्यान जप्त मुद्देमाल :
हातभट्टी दारू प्रकरणी 22 गुन्हे दाखल
मोहमास सडवा : 17,250 लिटर (₹8,62,500 अंदाजे)
हातभट्टी दारू : 166 लिटर (₹16,000 अंदाजे)
मोहफुले : 1,500 किलो (₹45,000 अंदाजे)
रसायनमिश्रित सिंधी : 2 प्रकरणे, 2,700 लिटर (₹54,000 अंदाजे)
गुटखा : 1 कारवाई (₹48,840 अंदाजे)
एकूण सुमारे ₹10,26,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अवैध वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली वाहने जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकरणात आतापर्यंत 25 आरोपी निष्पन्न झाले असून त्यांच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. कारवाईदरम्यान स्थानिक नागरिक व महिला भगिनींनी पोलीस प्रशासनाला मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या सहभागाबद्दल नांदेड जिल्हा पोलिसांनी आभार व्यक्त केले आहेत.
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अवैध दारू, अंमली पदार्थ, शस्त्रे, जुगार आदी बेकायदेशीर कृत्यांची माहिती तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्यास किंवा 112 हेल्पलाईनवर द्यावी. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल.
येथे गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात तांदळाचे व्यापार अवैध लॉक (गौंद )चा धंदामोठ्या प्रमाणात धान्य खरेदी व आंध्र प्रदेशात पाठवणे अशा अनेक प्रकार चे धंदे येथील दुकानदाराने थाटले आहे.