जर तुम्ही विद्यार्थी असाल किंवा ऑफिसमध्ये खूप मिटींग्स अटेंड करत असाल तर Otter.ai तुमच्यासाठी वरदान आहे. हे ॲप चालू संभाषणाचे (Voice) थेट मजकुरात (Text) रूपांतर करते. इतकेच नाही तर पूर्ण मिटींग संपल्यावर त्याचा Summary सुद्धा तयार करून देते. यामुळे तुम्हाला नोट्स काढण्याकडे लक्ष न देता प्रत्यक्ष संवादावर लक्ष केंद्रित करता येते. हे ॲप तुमची तासनतास चालणारी मिटींग काही मिनिटांत वाचनीय स्वरूपात आणते.
Lensa AIफोटो एडिटिंगसाठी आता तासनतास घालवण्याची गरज नाही. लेन्स एआय तुमच्या साध्या सेल्फीला एखाद्या कलाकृतीत किंवा अवतारमध्ये बदलू शकते. यातील मॅजिक अवतार हे फिचर जगभरात प्रसिद्ध आहे. याव्यतिरिक्त बॅकग्राउंड बदलणे, चेहऱ्यावरील डाग काढणे किंवा फोटोची लाइट सुधारणे ही कामे याचे AI अत्यंत नैसर्गिकरीत्या करते. तुमचे फोटो सोशल मीडियावर उठून दिसण्यासाठी हे एक मस्ट हॅव ॲप आहे.
Instagram Rules 2026 : ...तर इंस्टाग्रामवर दिसणार नाही तुमची पोस्ट; कुणासाठी लागू होतोय हा नवा नियम? जाणून घ्या Grammarlyइंग्रजीमध्ये ईमेल लिहिताना किंवा मेसेज करताना चुका होण्याची भीती आता विसरून जा. ग्रामरली केवळ स्पेलिंग चेक करत नाही, तर तुमच्या वाक्याचा टोन ओळखते. तुम्ही रागात आहात की नम्रपणे बोलत आहात, हे ओळखून ते तुम्हाला योग्य शब्द सुचवते. यातील नवीन GrammarlyGO हे AI फिचर तुम्हाला पूर्ण ईमेल किंवा आर्टिकल लिहिण्यास मदत करते ज्यामुळे तुमचे कम्युनिकेशन अधिक प्रभावशाली होते.
Canvaकॅनव्हा आता केवळ डिझाइनिंग टूल राहिलेले नाही, तर ते एक प्रगत AI पॉवरहाऊस बनले आहे. यातील मॅजिक स्टुडिओ वापरून तुम्ही केवळ एका वाक्यात सांगून हवी तशी इमेज तयार करू शकता (Text to Image). जर तुम्हाला एखादा फोटो हवा तसा वाढवायचा असेल किंवा फोटोमधील नको असलेली वस्तू काढायची असेल तर याचे AI टूल्स ते सेकंदात करतात. सोशल मीडिया पोस्ट असो किंवा ऑफिसचे प्रेझेंटेश कॅनव्हाचे AI तुमचे काम प्रोफेशनल बनवते.
Whatsapp News : फक्त 4 महिने उरले! 8 सप्टेंबरपासून 'या' मोबाईलवर व्हॉट्सॲप बंद; कंपनीचा मोठा निर्णय, पाहा यादीत तुमचा फोन आहे का? Duolingoनवी भाषा शिकणे आता कंटाळवाणे राहिलेले नाही. ड्युओलिंगो हे AI च्या मदतीने तुम्हाला खेळ खेळल्यासारख्या सोप्या पद्धतीने भाषा शिकवते. याचे AI अल्गोरिदम तुमचे शिकण्याचे कौशल्य ओळखतात आणि तुम्हाला कुठे अडचण येत आहे हे समजून घेऊन त्याप्रमाणे सराव करून घेतात. जर तुम्ही एखादा शब्द वारंवार चुकत असाल तर AI तुम्हाला त्याचा सराव पुन्हा पुन्हा करून घेते ज्यामुळे तुम्ही नैसर्गिक पद्धतीने कोणतीही भाषा आत्मसात करू शकता.