Raja Shivaji : नसेल होत तर सोडून दे…, 'राजा शिवाजी' च्या मागे रितेशची 10 वर्षांची मेहनत, मधल्या काळात नेमकं घडलं तरी काय?
Tv9 Marathi May 04, 2026 01:45 PM

Raja Shivaji : अभिनेता रितेश देशमुख स्टारर ‘राजा शिवाजी’ सिनेमाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमा चांगली कमाई करताना दिसत आहे. 1 मे रोजी ‘राजा शिवाजी’ सिनेमा चाहत्यांच्या भेटीस आला. पण सिनेमाची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. अखेर सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आणि चाहत्यांनी सिनेमाला डोक्यावर घेतलं. विश्लेषकांनी देखील सिनेमाचं कौतुक केलं. याचाच परिणाम बॉक्स ऑफिसवर होताना दिसत आहे. पण फार कमी लोकांना माहिती आहे की, ‘राजा शिवाजी’ सिनेमा बनवण्यासाठी रितेश याला तब्बल 10 वर्षांचा कालावधी लागली आहे… या काळात तीन वेळा तर अभिनेत्याला अपयशाचा सामना करावा लागला.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या मागचं सत्य सांगितलं आहे. ‘सिनेमा बनवण्यासाठी मी गेल्या 10 वर्षांपासून प्रयत्न करत आहे. पण तिन वेळा मला यश मिळालं नाही. 2016 मध्ये सिनेमा प्रदर्शित होणार होता, पण तसं काही झालं नाही, त्यानंतर 2019 मध्ये मी सिनेमाची घोषणा केली. तेव्हा देखील सिनेमा प्रदर्शित होऊ शकला नाही. कारण कोरोना महामारी होती. अखेर आता सिनेमा प्रदर्शित झाला आहे…’

‘पण जेव्हा यश मिळत नव्हतं, तेव्हा वाटलं ‘होत नाहीये तर सोडून दे…’ पण असं करण्याची हिंमत झाली नाही. आयडिया चांगली आहे, यावर काम करायला हवं… असं अनेकदा वाटलं. पण मी मागे हटलं पाहिजे ही देवाची देखील इच्छा नव्हती… म्हणून इतक्या वेळा अपयश मिळालं आहे, तर आता करुन घे… अशात अनेक जण मदतीसाठी पुढे आले आणि सिनेमा अखेर प्रेक्षकांच्या भेटीस आला…’, असं अभिनेता म्हणाला.

एवढंच नाही तर, ‘राजा शिवाजी’ सिनेमा करण्याची प्रेरणा कशी मिळाली? असा प्रश्न देखील अभिनेत्याला विचारण्यात आला… यावर अभिनेता म्हणाला, ‘अभिनेता अजय देवगण स्टारर ‘तान्हाजी’ सिनेमा पाहिल्यानंतर अनेक पुस्तकं वाचल आणि हा महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आहे आणि तो नवीन पिढ्यांनी जाणून घेतला पाहिजे. रितेश देशमुखच्या मते, ‘राजा शिवाजी’ हा सिनेमा अशाप्रकारे तयार झाला.’, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘राजा शिवाजी’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.