SBI Bank Servicesमुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियानं त्यांच्या ग्राहकांना महत्त्वाची सूचना दिली आहे. बँकिंग संदर्भातील काही काम असेल तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे. येत्या काही दिवसांमध्ये बँकेचं कामकाच जवळपास चार दिवस ठप्प राहण्याची शक्यता आहे. बँकेचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. त्यामुळं बँकेतील कामं ठप्प होऊ शकतात.
AISBISF ऑल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ फेडरेशननं सांगितलं की 25 आणि 26 मे रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाचा पूर्ण स्टाप संपावर असेल. संपत दोन दिवसांचा असेल मात्र बँकेचं कामकाच चार दिवस बंद राहणार आहे. कारण 23 मे या दिवशी चौथा शनिवार आहे तर 24 मे रोजी रविवारची सुट्टी आहे. म्हणजेच दोन दिवस सोमवारी आणि मंगळवार कर्मचारी संपावर असतील. यामुळं बँकेचं कामकाज चार दिवस ठप्प होईल.
AISBISF नं सांगितलं की हा संप दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मुद्यांची सोडवणूक करण्यासाठी करण्यात येत आहे. कर्मचार्यांची अपुरी संख्या, नोकरीच्या अटी, भरतीचे नियम आणि पेन्शनसंदर्भातील समस्या यामुळं कर्मचारी वर्ग त्रस्त आहे. काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे योग्यप्रकारे लक्ष दिलं जात नाही. पहिल्यांदा झालेल्या काही करारांना अद्याप लागू करण्यात आलं नाही. फेडरेशनकडून एसबीआयचे चेअरमन यांना 2 मे रोजी दिलेल्या नोटीसमध्ये इंडस्ट्रीयल डिस्प्यूटस एक्ट 1947 नुसार हा संप करण्यात असल्याचं सांगितलं आहे.
कर्मचाऱ्यांनी संप केल्यानं बँकेच्या शाखा असल्या तरी ऑनलाईन सेवांवर परिणाम होणार नाही. यामुळं शाखेतील कामं होऊ शकणार नाहीत. मात्र, चेक जमा करणं, रोख रक्कम जमा करणे, ही काम चार दिवस बंद असतील. डिजीटल सेवा चालू राहतील.