Pune Bar Protest: नसरापूर अत्याचार प्रकरणावर पुणे बार असोसिएशनचा तीव्र निषेध; आरोपीचे वकीलपत्र न घेण्याचे आवाहन
esakal May 06, 2026 02:45 AM

पुणे : नसरापूर येथे घडलेल्या अत्याचार प्रकरणाचा पुणे बार असोसिएशनकडून (पीबीए) तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. आरोपीचे कोणीही वकीलपत्र स्वीकारू नये, असे आवाहन पीबीएकडून सर्व वकिलांना करण्यात आले आहे.

या घटनेमुळे वकिलांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित आरोपीविरोधात कठोर भूमिका घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पीबीएच्या कार्यकारिणीने याबाबत सदस्य वकिनांना मेसेज करून वकीलपत्र न स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. ही घटना अतिशय क्रूर असून एका बालिकेने यात आपला जीव गमावला आहे.

आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. आरोपीच्या विरोधातील एक लढा म्हणून आम्ही सदस्यांना आरोपीचे वकीलपत्र न स्वीकारण्याची विनंती केली आहे, अशी माहिती पीबीएकडून देण्यात आली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.