Tamil Nadu Assembly Elections Result 2026 : तामिळनाडू विधानसभा निवडणुकांच्या (Tamil Nadu Assembly Elections Result 2026) निकालांमध्ये अभिनयातून निवृत्ती घेऊन राजकारणात एन्ट्री घेतलेल्या अभिनेत्यानं स्वतःचा पक्ष काढला आणि पहिल्याच निवडणुकीत प्रस्थापितांना पळता भुई थोडी करुन सोडलं. अभिनेता थलपती विजय (Actor Thalapathy Vijay) याच्या 'तमिलगा वेट्टी कड़गम' (Tamilaga Vettri Kazhagam) पक्षानं एक बलाढ्य शक्ती म्हणून 2026 च्या निवडणुकांमध्ये आपली छाप सोडली. या निवडणुकीत, थलपती विजय (Thalapathy Vijay) यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा जिंकण्यात यश मिळालं. आपल्या पहिल्याच निवडणुकीत पक्षानं बहुमत मिळवलंय.
टीव्हीके या पक्षाने विधानसभा निवडणुकीत 108 जागा जिंकल्यानंतर तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. टीव्हीकेने सरकार स्थापन करण्याचा आपला हक्क सांगत आणि सभागृहात आपले बहुमत सिद्ध करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत मागत राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांच्याकडे संपर्क साधला आहे. असे असताना विजयच्या सरकारला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसकडून अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती समोर आली आहे.
K. C. Venugopal : विजयच्या सरकारला पाठिंबा देण्याबाबत अंतिम निर्णय काँग्रेसच्या प्रदेश पातळीवर
तमिळनाडूत विजयच्या सरकारला पाठिंबा देण्याबाबत अंतिम निर्णय काँग्रेसच्या प्रदेश पातळीवर घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेस संघटन सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी दिली आहे. या विषयी अधिक बोलताना के.सी वेणुगोपाल म्हणाले, टीव्हीकेचे अध्यक्ष थिरू विजय यांनी तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडे पाठिंबा मागितला आहे. काँग्रेसचे म्हणणे आहे की तामिळनाडूमधील जनादेश हा धर्मनिरपेक्ष सरकारसाठी आहे. जे संविधानाचे अक्षरशः आणि भावनात्मक पालन करण्यास कटिबद्ध असेल.
तामिळनाडूचे सरकार कोणत्याही प्रकारे भाजप आणि त्यांच्या सहयोगींच्या हाती जाऊ नये, याविषयी काँग्रेस ठाम आहे. विजय यांनी पेरुंथलैवर कामराज यांच्याकडून प्रेरणा घेण्याबद्दलही सांगितले आहे. त्यानुसार, काँग्रेस नेतृत्वाने तामिळनाडू काँग्रेस समितीला (टीएनसीसी) निवडणूक निकालातून व्यक्त झालेल्या राज्यातील जनभावनांचा विचार करून विजय यांच्या विनंतीवर अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.
Thalapathy Vijay : बहुमतासाठी काँग्रेस पक्षाकडे संपर्क, राहुल गांधी यांना पाठिंब्याची विनंती करणारे पत्र
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सरकार स्थापनेसंदर्भातील राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. थलपथी विजय यांच्या पक्षाने, तामिळगा वेत्री कळघम (टीव्हीके), बहुमतासाठी काँग्रेस पक्षाकडे संपर्क साधला आहे. सूत्रांनुसार, विजय यांनी या संदर्भात पाठिंब्याची विनंती करणारे पत्र राहुल गांधी यांना लिहिले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस पक्ष तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी टीव्हीकेला पाठिंबा देईल आणि सरकारमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. 240 सदस्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीत, तामिळनाडूच्या जनतेने थलपथी विजय यांच्या टीव्हीके पक्षाला प्रचंड पाठिंबा दिला, परिणामी त्यांच्या पक्षाने 108 जागा जिंकल्या, तर काँग्रेसला 5 जागा मिळाल्या आहेत.