Summer Breakfast Recipes: थंडाव्याचा पॉवरहाऊस! एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल फ्रेश पुदिना पराठा
esakal May 06, 2026 11:45 AM

Summer Breakfast Ideas: उन्हाळ्यात सकाळी हलकं आणि ताजं काही खायचं असेल, तर पुदिन्याचा पराठा एकदम बेस्ट आहे. पुदिन्याचा छान सुगंध आणि हलकी चव यामुळे हा पराठा खूपच टेस्टी लागतो आणि शरीरालाही थंडावा देतो. बटाटा किंवा पनीर पराठा जड वाटत असेल, तर हा पुदिना पराठा ब्रेकफास्टसाठी परफेक्ट पर्याय आहे. गरमागरम पराठा दही किंवा लोणच्यासोबत खाल्ला, की चव अजूनच छान लागते!

साहित्य
  • २ कप गव्हाचे पीठ

  • १ कप ताजी पुदिन्याची पानं (बारीक चिरलेली)

  • १–२ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)

  • १ टीस्पून जिरे

  • १/२ टीस्पून लाल तिखट

  • चवीनुसार मीठ

  • पाणी (पीठ मळण्यासाठी)

  • तेल किंवा तूप (पराठा भाजण्यासाठी)

Sattu Paratha : उन्हाळ्यात हलकं आणि चविष्ट खायचंय? नाश्त्यासाठी झटपट तयार करा खास सत्तू पराठा कृती
  • एका भांड्यात गव्हाचं पीठ चाळून घ्या आणि त्यात मीठ घाला.

  • आता त्यात बारीक चिरलेला पुदिना, हिरव्या मिरच्या, जिरे आणि लाल तिखट घालून सर्व साहित्य छान मिक्स करा.

  • थोडं-थोडं पाणी घालत मऊसर पीठ मळा.

  • वरून थोडंसं तेल लावून पीठ झाकून १० मिनिटं ठेवा.

  • नंतर पीठाचे समान गोळे करा आणि पराठ्यासारखे लाटून घ्या.

  • तवा मध्यम आचेवर गरम करून पराठा दोन्ही बाजूंनी भाजा.

  • भाजताना दोन्ही बाजूंनी थोडंसं तेल किंवा तूप लावून कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्या.

  • सर्व्हिंग टिप

    गरमागरम पुदिना पराठा दही आणि लोणच्यासोबत सर्व्ह करा. उन्हाळ्यासाठी अगदी परफेक्ट कॉम्बिनेशन आहे!

    Protein Packed Breakfast Recipe: प्रोटीनचा पॉवरहाऊस! एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल खमंग चणा डाळ पराठा टिप्स
    • पुदिना थोडा जास्त वापरला तर चव आणखी ताजी वाटते, मात्र प्रमाणात समतोल राखणं आवश्यक आहे.

    • इच्छा असल्यास थोडंसं ओवा टाका, पचनाला मदत होते.

    • पराठा जास्त कुरकुरीत हवा असल्यास थोडं तूप वापरा.

    हा पुदिना पराठा तुमच्या ब्रेकफास्टला नक्कीच एक फ्रेश, हेल्दी आणि चविष्ट सुरुवात देईल!

    © Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.