Marathi Rashi Bhavishya : आज 6 मे 2026ला ग्रहांचं संक्रमण तुमच्या करिअर आणि आर्थिक स्थिती महत्त्वाचे संकेत देणार आहे. बुधदेवाच्या अस्तामुळे आणि इतर प्रमुख ग्रहांच्या संक्रमणात बदल होणार आहे. याचा परिणाम काही राशींच्या करिअर आणि आर्थिक बाबींवर दिसून येणार आहे.
मेष रास :
आर्थिक भविष्य - आजचा दिवस तुम्हाला ठीक जाईल. प्रवास किंवा नव्या शिक्षणावर खर्च होईल. जोखमीची गुंतवणूक टाळा. बृहस्पतीमुळे कम्युनिकेशन आणि नेटवर्किंगमध्ये छोटे लाभ होतील. स्वतःसाठी खर्च कराल. तुमच्या बजेटवर लक्ष द्या.
करिअर - करिअरमध्ये आज प्रगती होईल. चंद्रामुळे काहीतरी नवीन शिकाल. बुधाच्या अस्तामुळे नवीन सूचना समजण्यात गोंधळ होईल. सहकाऱ्यांशी संवाद साधा.
वृषभ रास :
आर्थिक : आज आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. येणाऱ्या खर्चांमुळे चिंता वाढेल. सट्टेबाजी किंवा जोखमीच्या गुंतवणुकींपासून दूर राहा. बचत आणि बजेटवर लक्ष द्या. भविष्य सुरक्षित ठेवा. कुणालाही उधारी देऊ नका.
करियर : योजनापूर्वक कामाचा फायदा होईल. कोणतीही मोठी जोखीम घेऊ नका. ऑफिसमधील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवा. मंगळ आणि शनीमुळे धनप्राप्ती उशिरा होईल. संयमाने काम करा. तुमचा प्रॅक्टिकल विचार तुम्हाला अडचणींमधून दूर करेल.
मिथुन रास :
आर्थिक : आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस असामान्य जाईल. नेटवर्किंग किंवा भागीदारीतून लाभ होईल पण खर्चात वाढ संभवते. अनावश्यक खर्च करू नका. आर्थिक योजना काळजीपूर्वक तयार करा. गुरूमुळे दीर्घकालीन प्रगती होईल. आर्थिक व्यवहारात स्पष्टपणे संवाद ठेवा.
करियर : कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढेल. दहाव्या घरात मंगल आणि शनी असल्यामुळे कामात उशीर होईल. संयमाने काम करा. भागीदारीमुळे कामाला महत्व येईल. ईमेल आणि कोणत्याही प्रकारचे संदेश तपासल्याशिवाय पाठवू नका. वरिष्ठांशी समन्वय साधा.
कर्क रास :
आर्थिक : पद्धतशीर आर्थिक योजना बनवा. अनपेक्षित खर्चाचा त्रास होईल. बचतीकडे लक्ष द्या. आर्थिक लाभाच्या संधी निर्माण होतील. गुंतवणुकीत घाई करू नका. आर्थिक शिस्तीनेच स्थिरता येईल.
करियर: दहाव्या स्थानातील सूर्य तुमची महत्त्वाकांक्षा आणि कार्यक्षमता वाढवेल. मेहनतीमुळे नवी ओळख मिळेल. कोणतेही काम नीट माहिती घेऊन पूर्ण करा.
सिंह रास :
आर्थिक : आजचा दिवस साधारण जाईल. क्रिएटिव्ह कामातून लाभ मिळेल. आठव्या घरात मंगळ आणि शनी असल्यामुळे मोठे धोके टाळा. आर्थिक योजना काळजीपूर्वक आखा. संपर्कातून नफा मिळेल. दीर्घकालीन योजनांमध्ये गुंतवणूक लाभदायक ठरेल.
करियर : तुमची प्रगती होतील. व्यावसायिकांना नवीन ओळख मिळेल. तुमची प्रशंसा होईल. सूर्यामुळे उच्च शिक्षणात लाभ होईल.
कन्या रास :
आर्थिक : आर्थिक स्थिती स्थिर असेल पण सावधगिरी बाळगा. कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका. कर्जाच्या बाबतीत सावध राहा. गुरु करियर बाबतीत लाभ देईल. घरगुती सुविधांवर खर्च करा. बजेटच पालन करा.
करियर : करियरमध्ये चांगली संधी मिळेल. नवीन प्रोमोशन मिळू शकते. कामाच्या ठिकाणी नवीन आव्हाने मिळू शकतात. शिस्तीमुळे यश मिळेल.
तूळ रास :
आर्थिक : आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या सामान्य असेल. सातत्यपूर्ण प्रयत्नांचा लाभ होईल. अनपेक्षित खर्च टाळण्यासाठी बजेट तयार करा. गुरूमुळे नवीन प्रवास होतील. अनावश्यक खर्च करू नका.
करियर :तुमच्या व्यक्तिमत्त्वामुळे करियरमध्ये प्रगती होईल. तिसऱ्या स्थानातील चंद्रामुळे एखादा नवीन उपक्रम हाती घ्याल. सहकाऱ्यांशी वाद करू नका.
वृश्चिक रास :
आर्थिक : आर्थिक व्यवस्थापनकडे लक्ष द्या. चंद्रामुळे बचतीमध्ये वाढ होईल. अनावश्यक खर्च कमी करा. आठव्या घरातील गुरूमुळे सहज मिळणाऱ्या पैशांबाबत सावध राहा. जोखमीच्या गुंतवणुकी करू नका.
करियर : करियरमध्ये लक्ष केंद्रित करून शिस्तबद्ध राहा. सहाव्या घरात असलेला सूर्य तुम्हाला आव्हानांना सामोरं जाण्यासाठी सक्षम करेल. जबाबदाऱ्या उत्तम पार पाडाल. कामाच्या ठिकाणी गैरसमज होऊ देऊ नका.
धनु रास :
आर्थिक : आर्थिकदृष्ट्या दिवस स्थिर असेल. चैनीच्या वस्तू किंवा घरगुती वस्तूंवर खर्च कराल. दैनंदिन खर्चांमध्ये स्थिरता येईल. जोखमीची गुंतवणूक टाळा. आर्थिक लाभाच्या नव्या संधी निर्माण होतील.
करियर : करियरमधील प्रगती तुमच्या स्वतःच्या पुढाकारावर अवलंबुन आहे. कामाच्या ठिकाणी धाडसी निर्णय घ्याल. कोणताही गैरसमज टाळण्यासाठी सहकाऱ्यांशी संवाद साधताना स्पष्टता ठेवा.
मकर रास :
आर्थिक : आज आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. चंद्रामुळे अनावश्यक खर्च वाढेल. बजेटला धरून खर्च करा. जोखमीची गुंतवणूक टाळा. बचतीच्या सवयीचा लाभ होईल.
करियर : करियरमध्ये शांत राहण्याची गरज आहे. जबाबदाऱ्या पार पाडाल. कामाच्या ठिकाणी वाद करू नका. शांतपणे केलेलं काम प्रगती मिळवून देईल.
कुंभ रास :
आर्थिक : आर्थिकदृष्ट्या दिवस साधारण आहे. भागीदारी किंवा क्रिएटिव्ह कामातून नफा होईल. खर्चवर आणि संभाषणावर नियंत्रण ठेवा. आज जोखमीची गुंतवणूक करू नका. आर्थिक बाबींचे काळजीपूर्वक नियोजन करा.
करियर : करियरमधील प्रगतीसाठी नवीन कल्पना महत्त्वाचा ठरतील. सामूहिक प्रयत्नांचा लाभ होईल. सातत्य ही यशाची गुरुकिल्ली आहे.
मीन रास :
आर्थिक : आर्थिक गोष्टींकडे विशेष लक्ष द्या. उत्पन्नात वाढ होईल पण निर्णय घेताना सावधगिरी बाळगा. जोखमीची गुंतवणूक करू नका. आर्थिक योजना काळजीपूर्वक तयार करा. चैनीच्या वस्तूंवर खर्च कराल.
करियर : आज तुमच्या आयुष्यात करियर महत्त्वाची भूमिका बजावेल. कामाच्या ठिकाणी मोठे निर्णय घ्याल. कामाचा भर वाढेल. गैरसमज टाळा.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
येत्या 10 दिवसांमध्ये बदलणार 6 राशींचं नशीब ! शनिश्चरी अमावस्येपासून मिळणार मोठं यश आणि धनप्राप्ती