पुणे : शहराला पाणीपुरवठा करणान्या चारही धरणांमध्ये सध्या ९.५८ टीएमसी पाणीसाठा आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत हा पाणीसाठा (Pune Water) जास्त आहे. त्यामुळे येत्या ३१ मेपर्यंत पुण्याच्या पाण्यात कपात केली जाणार नाही, असा निर्णय पुण्याच्या महापौर मंजूषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काल (मंगळवारी, ता ६) घेण्यात आला आहे. त्यामुळे आता पुणेकरांना पाणी कपातीपासून दिलासा मिळाला आहे. वेधशाळेचा पावसाचा अपडेट अंदाज आणि पाणीसाठ्याची स्थिती पाहून ३१ मेनंतर आढावा बैठक घेऊन पाणी कपात करायची की नाही? याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.(Pune Water)
याबाबत बोलताना महापौर मंजुषा नागपूरे म्हणाल्या, पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. पाणीकपात ३१ मेपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. पुणेकरांसाठी दिलासादायक निर्णय घेत महापालिकेने ३१ मेपर्यंत पाणीकपात न करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या धरणांमध्ये पाणीसाठा उपलब्ध असून तो गतवर्षीपेक्षा अधिक आहे. ‘एल निनो’मुळे कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने १५ टक्के कपातीची मागणी केली होती. मात्र, सध्याच्या परिस्थितीत कपात टाळण्यात आली आहे. पुढील स्थितीचा आढावा ३१ मेनंतर घेतला जाणार असून आवश्यकतेनुसार निर्णय होणार आहे.(Pune Water)
पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी जीवनदायणी ठरलेलं उजनी धरण आज मायनसमध्ये गेलं आहे. सध्या उजनी धरणामध्ये एकूण पाणी साठवण क्षमतेच्या 63 पूर्णांक 31 टीएमसी इतकाच पाणीसाठा आहे. उजनी धरण 100% क्षमतेने भरते त्यावेळी उजनी धरणात 117 टीएमसी पाणीसाठा मावतो. यापैकी 54 टीएमसी पाणीसाठा हा जिवंत तर उर्वरित 63 टीएमसी पाणीसाठा हा मृत पाणीसाठा म्हणून गणला जातो. उजनी धरणावर पुणे, सोलापूर जिल्ह्यातील शेतीचा पाणी प्रश्न यासोबत लहान मोठ्या पाणीपुरवठ्याच्या योजना अवलंबून आहे. आज उजनी मायनस गेले असल्यामुळे पुढील दोन अडीच महिने आहे त्या उपलब्ध पाणी साठ्यावर काढावी लागणार आहेत.
अल निनोचा धोका लक्षात घेता या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने कमी पावसात अधिक उत्पन्न देणाऱ्या पीक पद्धतीचे शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यायला सुरवात केली. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा अंतर्गत हवामान अनुकूल तंत्रज्ञान वापरणे, रुंद वरंभे पद्धतीने पिकाची लागवड कशी करणे यासाठी नागपूर कडक उन्हात कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांना प्रशिक्षण देत आहे. या माध्यमातून येणाऱ्या खरीप हंगामात अल निनोच्या प्रभावाशी लढता येऊन कमी पावसात देखील अधिक उत्पन्न कसे घेता येईल यासाठी सरकारचा प्रयत्न करत असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे होणाऱ्या शेतीवरील परिणामांपासून सक्षम बनवणे हा आहे. हवामान अनुकूल शेती विकसित करण्याचे प्रशिक्षण देणे,पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन करणे, मातीची गुणवत्ता सुधारणा करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, नवीन तंत्रज्ञान व पद्धतींचा प्रसार करणे हे योजनेचे उद्देश आहे.