Sunrisers Hyderabad vs Punjab Kings Marathi Update: सलग दोन पराभवानंतरही पंजाब किंग्सच्या क्षेत्ररक्षणात काही सुधारणा दिसली नाही. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात शशांक सिंग, कूपर कॉनली व ल्युकी फर्ग्युसन यांनी सोपे झेल टाकले आणि त्यात प्रभसिमनर सिंगनेही स्टम्पिंगची संधी गमावली. तीन जीवदान मिळालेल्या इशान किशनने ( Ishan Kishan) मग पंजाबच्या गोलंदाजांचे हाल केले. त्यात एक जीवदान मिळालेल्या हेनरिच क्लासननेही सातत्य राखताना वादळी अर्धशतक झळकावून ऑरेंज कॅप नावावर केली.
अभिषेक शर्माने १३ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ३५ धावांची वादळी सुरुवात करून दिली. ट्रॅव्हिस हेड १९ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ३८ धावांवर माघारी परतला. त्यानंतर पंजाबच्या गोलंदाजांनी विकेटच्या संधी निर्माण केल्या होत्या. युझवेंद्र चहलच्या एकाच षटकात इशान किशनचा झेल सुटला अन् स्टम्पिंगची संधीही गमावली. मिळालेल्या संधीचं सोनं करताना इशानने ३२ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ५५ धावा केल्या. सुर्यांश शेडगेने त्याचा झेल टिपला. इशान व क्लासन यांनी ४८ चेंडूंत ८८ धावांची केली.
त्यानंतर क्लासनने मोर्चा सांभाळताना आणखी एक अर्धशतक पूर्ण केले आणि संघाला १७ षटकात दोनशे धावांपर्यंत पोहोचवले. SRH ने पंजाबविरुद्ध ८ वेळा २०० हून अधिक धावा कुटल्या आहेत आणि मुंबई इंडियन्सच्या विक्रमाशी ( ८ वि. दिल्ली) बरोबरी केली. क्लासनने चौथ्या विकेटसाठी नितीश कुमार रेड्डीसह २८ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. पंजाबच्या गोलंदाजांनी शेवटच्या षटकांत चांगले पुनरागमन केले आणि २५० पार जाणाऱ्या हैदराबादला ३ बाद २३५ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले.
SRH vs PBKS Live: ३ झेल अन् १ स्टम्पिंगची संधी गमावली... पंजाबच्या खेळाडूंनी युझवेंद्र चहलवर रडण्याची वेळ आणली Video Viralनितीश १३ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह २९ धावांवर नाबाद राहिला. क्लासन ४३ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ६९ धावांवर डावाच्या शेवटच्या चेंडूवर झेलबाद झाला.
Highest totals for SRH vs PBKS in IPL
247/2, हैदराबाद येथे, 2025 (दुसरा डाव)
235/4, हैदराबाद येथे, 2026 (पहिला डाव)*
219/6, मुल्लानपूर येथे, 2026 (पहिला डाव)
215/6, हैदराबाद येथे, 2024 (दुसरा डाव)
212/6, हैदराबाद येथे, 2019 (पहिला डाव)