आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 50 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने असणार आहेत. हा सामना भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. हा सामना गमावल्यास लखनौ सुपर जायंट्सचं अधिकृतरित्या स्पर्धेतून पॅकअप होईल. त्यामुळे लखनौसाठी हा सामना करो या मरो तसेच आर या पार असाच आहे.